Advertisement

CDS II 2020: ने सीडीएस II परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी (Union Public Service Commission, UPS)ने सीडीएस II म्हणजे कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिस सेकेंड एक्झाम (Combined Defence Services II Examination or ) चा रिझल्ट अधिकृत वेबसाइट https://ift.tt/2G2dF5E वर जाहीर केला आहे. परीक्षेला उपस्थित असलेले परीक्षार्थी अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. या परीक्षेमध्ये १२९ विद्यार्थी पास झाले आहेत. असा पाहा निकाल सर्वात आधी यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर What’s Newवर जा आता Final Result: Combined Defence Services Examination (II), 2020 लिंकवर क्लिक करा. आता Final Result या लिंकवर क्लिक करा. आता पीडीएफ फाइल खुली होईल. या पीडीएफमध्ये आपले नाव आणि रोल नंबर टाकून रिझल्ट पाहू शकता. बातमीखाली देण्यात आलेल्या थेट लिंकवर जाऊन रिझल्ट पाहू शकता. ही परीक्षा नोव्हेंबर २०२० मध्ये आयोजित करण्यात आली होती. सर्व निवड झालेल्या उमेदवारी तात्पुरत्या स्वरुपाची आहे. सैन्य मुख्यालयाद्वारे निवडलेल्या उमेदवारांची जन्मतारीख आणि शैक्षणिक पात्रता पडताळणीची प्रक्रिया अद्याप सुरु आहे. अशावेळी उमेदवारांनी दिलेली जन्म तारीख, शैक्षणिक पात्रतेसंदर्भातील कागदपत्रांची पुर्तता करावी. तसेच भूदल, नौदल, वायुदलापैकी त्यांची पहिली आवड नोंदवावी. तसेच परीक्षेसंदर्भातील माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अर्जदारांना त्यांच्या पत्यामध्ये बदल करायचा असल्यास त्यांनी सैन्य मुख्यालयाला यासंदर्भात माहिती द्यावी. संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेचे (II), २०२० गुण अधिकारी प्रशिक्षण प्रशिक्षण (ओटीए) च्या अंतिम निकालाच्या घोषणेनंतर वेबसाइटवर जाहीर केले जातील.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2TmLlVu
via nmkadda