
म. टा. प्रतिनिधी, नाशिक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत () शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या उन्हाळी परीक्षा १० ऑगस्टपासून (Final year exams)सुरू होणार असून, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ऑनलाइन पद्धतीने त्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. कृषी अभ्यासक्रमांच्या परीक्षा मात्र विद्यापीठामार्फत २३ जुलैपासून घेतल्या जाणार आहेत. करोना प्रादुर्भावामुळे मुक्त विद्यापीठामार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी जानेवारी महिन्यापर्यंत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. तसेच अभ्यास केंद्रे बंद असल्यामुळे या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागले. या सगळ्यांमुळे दरवर्षी मे महिन्यात होणाऱ्या या परीक्षा यंदा ऑगस्टमध्ये आयोजित करण्यात आल्या असून, १० ऑगस्टपासून विद्यापीठामार्फत राबवल्या जाणाऱ्या १८१ अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापूर्वी विद्यापीठाच्या १६ कृषी अभ्यासक्रमांच्या परीक्षा २३ जुलैपासून आयोजित केल्या जाणार आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ऑनलाइन परीक्षा होणार असून, विद्यार्थ्यांना कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाइल, टॅब या माध्यमातून ती देता येणार आहे. विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांना प्रवेश घेतलेले जवळपास साडेसहा लाख विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. बी. पी. पाटील यांनी दिली. दिवसभरात पाच तासांच्या तीन सत्रांत ही ऑनलाइन परीक्षा होणार आहे. या पाच तासांत विद्यार्थ्याला कधीही लॉगइन करता येणार आहे. लॉगइन केल्यापासून एक तासाच्या आता पेपर जमा करावा लागणार आहे. बहुपर्यायी स्वरुपाचे ५० प्रश्न विद्यार्थ्यांना या परीक्षेत विचारले जाणार आहेत. त्यापैकी ६० गुणांसाठी ३० प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना द्यावी लागणार असून, प्रत्येक उत्तराला दोन गुण दिले जाणार आहेत. परीक्षेनंतर ३० दिवसांत निकाल जाहीर केला जाणार असल्याचे विद्यापीठामार्फत सांगण्यात आले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3z9ewdS
via nmkadda
0 टिप्पण्या