Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ०४, २०२१ WIB
Last Updated 2021-08-04T13:43:26Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

सीबीएसई बारावीच्या ६५ हजारहून अधिक विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर, इथे पाहा Rojgar News

Advertisement
CBSE Class 12 results 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE)ने मंगळवारी ६५ हजारहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले आहेत. या निकालास 'RL'(result later) कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आले होते. अशा उमेदवारांना आपला निकाल अधिकृत वेबसाइट bse.gov.in वर पाहता येणार आहे. सीबीएसई बारावीच्या निकालाची घोषणा ३० जुलैला करण्यात आली होती. त्यावेळी एकूण ६५ हजार १८४ विद्यार्थ्यांना आपला निकाल मिळाला नाही. त्यांचे निकाल अद्यापही प्रक्रियेमध्ये होते. ५ ऑगस्टपर्यंत हे निकाल जाहीर केले जातील असे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार या उर्वरित विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. CBSE Class 12 results 2021: असा तपासा निकाल स्टेप १ - सर्वात आधी अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वर जा स्टेप २ - "Senior School Certificate Examination (Class XII) Results of R.L. CASES : LOT-1 2021" लिंकवर क्लिक करा. (बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे.) स्टेप ३- मागितलेली माहिती भरा स्टेप ४ - रिझल्ट तुमच्या समोर येईल स्टेप ५- भविष्यातील उपयोगासाठी प्रिंटआऊट काढून ठेवा सीबीएसईने ३० जुलैला बारावीच्या निकालाची घोषणा केली. त्यानुसार यावर्षी ९९.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सीबीएसई बोर्डामध्ये यावर्षी देखील मुलींनी बाजी मारली असून मुलांपेक्षा ०.५४ टक्के चांगला परफॉर्मन्स दिला आहे. विद्यार्थीनींचा निकाल ९९.६७ टक्के आहे. तर विद्यार्थ्यांचा निकाल ९९.१३ टक्के आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3inELaJ
via nmkadda