Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २४, २०२१ WIB
Last Updated 2021-09-24T12:43:08Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

AIIMS नागपूरमध्ये भरती, २५ हजारपर्यंत मिळेल पगार Rojgar News

Advertisement
AIIMS Recruitment 2021: एम्स नागपूरमध्ये ( Recruitment 2021) नैतिकता समिती समन्वयक या पदासाठी भरती केली जाणार आहे. संस्थेतर्फे पदभरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले. असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, पगार यांचा तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. थेट मुलाखतीतून ही निवड होणार आहे. ऑल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सच्या(All India Institute of Medical Sciences Nagpur) माध्यमातून ही भरती केली जात आहे. ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे. शैक्षणिक आर्हता नैतिकता समिती समन्वयक () या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे B.Sc/B.Pharm आणि क्लिनिकल रिसर्चमध्ये पदव्युत्तर शिक्षण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे क्लिनिकल रिसर्च असोसिएट म्हणून काम केल्याचा अनुभव असणे गरजेचे आहे. पगार नैतिकता समिती समन्वयक (Ethics Committee Coordinator) पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला २५ हजार रुपये दरमहा पगार दिला जाणार आहे. या पदभरतीसाठी उमेदवारांना सर्वप्रथम ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. एम्स नागपूरची अधिकृत वेबसाइटवर जाऊन उमेदवार नोंदणी करु शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचावे. त्यानंतरच अर्ज करा. या पदाची भरती २७ सप्टेंबर २०२१ रोजी थेट मुलाखतीतून होणार आहे. यासाठी उमेदवाराने फार्माकोलॉजी विभाग, कॉलेज इमारत (तिसरा मजला) एम्स, नागपूर या पत्त्यावर उपस्थित राहणे गरजेचे आहे. उमेदवारांनी सकाळी ११ वाजता पोहोचणे गरजेचे आहे. मुलाखतीला येताना मुळ कागदपत्र आणि पासपोर्ट साइज फोटो सोबत आणायचा आहे. कागदपत्रांची छाननी आणि पडताळणी झाल्यानंतर पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. अर्ज आणि कागदपत्रांमध्ये काही घोळ आढळल्यास उमेदवाराची मुलाखत घेतली जाणार नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Zn7ohb
via nmkadda