BECIL मध्ये डेटा एंट्री ऑपरेटरसह अनेक जागा रिक्त, आठवी पास ते पदवीधरांना संधी Rojgar News

BECIL मध्ये डेटा एंट्री ऑपरेटरसह अनेक जागा रिक्त, आठवी पास ते पदवीधरांना संधी Rojgar News

BECIL : ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडमध्ये डेटा एंट्री ऑपरेटरसह अनेक पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या रिक्त पदांवर () एकूण १०३ पदांची भरती केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते बीईसीआयएलची अधिकृत वेबसाइट becil.com द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) ने जाहीर केलेल्या नोटीसनुसार, अप्रेन्टिस, , सुपरवायझर आणि सिनीअर वायझर या पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांना ७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरेजेचे आहे. कारण अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास अर्ज बाद करण्यात येईल. रिक्त पदाचा तपशील या रिक्त जागांद्वारे एकूण १०३ पदांची भरती केली जाणार आहे. अॅप्रेंटिस/लोडरसाठी ५७, डेटा एंट्री ऑपरेटरसाठी ७, सुपरवायझरसाठी २० आणि सिनीअर सुपरवायझरसाठी ९ पदांसाठी भरती होणार आहे. अधिकृत नोटिफिकेशनमध्ये यासंदर्भातील अधिक तपशील देण्यात आला आहे. बातमीखाली देण्यात आलेल्या लिंकवरुन थेट नोटिफिकेशनवर जाऊ शकता. या गोष्टी लक्षात ठेवा ने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी नसेल, तर त्याने ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी त्याचा नवीन ईमेल आयडी तयार करणे गरजेचे आहे. डेटा एंट्री ऑपरेटर, सुपरवायझर या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३० वर्षे असावे. याशिवाय सिनीअर सुपरवायझर पदासाठी उमेदवारांचे वय ३५ वर्षे असावे. डेटा एंट्री ऑपरेटर, सुपरवायझर या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असावेत. या व्यतिरिक्त इतर पदांचा तपशील नोटिफिकेशनमध्ये पाहता येणार आहे. शैक्षणिक पात्रता: अप्रेंटिस/लोडर - आठवी पास डेटा एंट्री ऑपरेटर, सुपरवायझर, सिनीअर सुपरवायझर - पदवीधर. वयोमर्यादा हँडमन/लोडर-कमाल ४५ वर्षे डेटा एंट्री ऑपरेटर आणि सुपरवायझर - ३० वर्षे सिनीअर सुपरवायझर - ३५ वर्षे


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CSgVey
via nmkadda

0 Response to "BECIL मध्ये डेटा एंट्री ऑपरेटरसह अनेक जागा रिक्त, आठवी पास ते पदवीधरांना संधी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel