CTET 2021: सीटीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर Rojgar News

CTET 2021: सीटीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर Rojgar News

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या (CTET)तारखा जाहीर केल्या आहेत. CTET परीक्षेचे आयोजन संगणकीकृत पद्धतीने (कॉम्प्युटर आधारित टेस्ट CBT) १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ पर्यंत केले जाणार आहे. संपूर्ण देशभरात २० भाषांमध्ये ही परीक्षा आयोजित केली जाईल. विस्तृत माहिती पुस्तिकेत परीक्षा,अभ्यासक्रम, पात्रता, परीक्षा शुल्क, परीक्षा शहर महत्त्वाच्या तारखा आदि माहिती असेल. सीटीईटीची अधिकृत वेबसाइट वर ही माहिती उपलब्ध केली जाईल. सीबीएसईने इच्छुक उमेदवारांना आवाहन केले आहे की त्यांनी ऑफिशियल वेबसाइटच्या माध्यमातून ही माहिती डाऊनलोड करावी आणि अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. इच्छुक उमेदवारांना केवळ सीटीईटी वेबसाइट ctet.nic.in च्या माध्यमातूनच ऑनलाइन अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २० सप्टेंबर २०२१ पासून सुरू होणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत १९ ऑक्टोबर २०२१ आहे आणि २० ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत शुल्क भरायचे आहे. एका पेपरसाठी अर्ज करण्यासाठी सर्वसामान्य प्रवर्ग /ओबीसी उमेदवारांना १००० रुपये आणि दोन्ही पेपरसाठी १२०० रुपये शुल्क भरावे लागेल. एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांना एका पेपरसाठी अर्ज शुल्क ५०० रुपये आणि दोन पेपरसाठी ६०० रुपये आहे. सीबीएसईने जुलै २०२१ मध्ये केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) २०२१ च्या परीक्षा पॅटर्नच्या सुधारणेसंबंधी एक महत्त्वाची अधिसूचना जारी केली होती. यानुसार, कमी तथ्यात्मक ज्ञान आणि अधिक वैचारिक समज आणि अर्ज, समस्या-समाधार आदी माहितीसाठी प्रश्नपत्रिका विकसित केली जाईल. परीक्षेसाठी कशी कराल नोंदणी? उमेदवार पुढे दिलेल्या स्टेप्सच्या मदतीने अगदी सहजरित्या रजिस्ट्रेशन करू शकतील - स्टेप १: रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात आधी सीटीईटीच्या ऑफिशियल वेबसाइट ctet.nic.in वर जा. स्टेप २: वेबसाइट वर दिलेल्या रजिस्ट्रेशनच्या लिंक वर क्लिक करा. स्टेप ३: आता नाव, ईमेल, मोबाइल नंबर आणि विचारलेली अन्य माहिती सबमिट करून लॉग इन जनरेट करा. स्टेप ४: आता लॉग इन करा. स्टेप ५: अॅप्लिकेशन फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरा आणि सबमिट करा. स्टेप ६: फोटो आणि साइन अपलोड करा. स्टेप ७: आता अॅप्लिकेशन शुल्क जमा करा. स्टेप ८: अॅप्लिकेशनची सर्व प्रक्रिया पूर्ण करून शेवटी कंफर्मेशन पेजचं प्रिंट आऊट घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VPrU8Q
via nmkadda

0 Response to "CTET 2021: सीटीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel