Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०७, २०२१ WIB
Last Updated 2021-09-07T11:43:54Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Government jobs : BHEL मध्ये विविध पदांवर भरती, जाणून घ्या डिटेल्स Rojgar News

Advertisement
BHEL Recruitment 2021: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांपैकी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) ने इंजिनीअर (सिव्हिल) आणि सुपरवायझर (सिव्हिल) पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कंपनीतर्फे देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार, सिव्हिल इंजिनीअरिंग ट्रेडमध्ये विशिष्ट कालावधीच्या नियुक्तीसाठी इंजिनीअर आणि सुपरवायझरच्या एकूण २२ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. याप्रमाणे करा अर्ज BHEL मध्ये इंजिनीअर आणि सुपरवायझर पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना कंपनीचे भरती पोर्टल careers.bhel.in वर जावे लागेल. तिथे दिलेल्या लिंकवरून अर्ज डाउनलोड करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी हा फॉर्म पूर्ण भरावा आणि मागितलेल्या कागदपत्रांसह २४ सप्टेंबर २०२१ पर्यंत दिलेल्या पत्त्यावर जमा करावा. अर्जासोबतच, उमेदवारांना ऑनलाईन पेमेंट झाल्याची पावती किंवा डिमांड ड्राफ्ट देखील जोडावा लागेल. पात्रता निकष BHEL इंजिनीअर आणि सुपरवायझर भरतीच्या जाहिरातीनुसार, मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी पूर्ण आणि इतर उच्च शिक्षणात किमान ६० टक्के गुण असलेले उमेदवार इंजिनीअरिंग (सिव्हिल) पदासाठी पात्र आहेत.तर आरक्षित वर्गासाठी किमान कट ऑफ ५० टक्के आहे. त्याचप्रमाणे सुपरवायझर (सिव्हिल) पदांसाठी उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. तसेच आरक्षित श्रेणींसाठी किमान कट ऑफ ५० टक्के आहे. याशिवाय १ सप्टेंबर २०२१ पर्यंत दोन्ही पदांसाठी उमेदवारांचे वय ३४ वर्षांपेक्षा जास्त नसावे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3l5kwPv
via nmkadda