IAF AFCAT 2 result 2021: हवाई दलाच्या एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्टचा निकाल जाहीर Rojgar News

IAF AFCAT 2 result 2021: हवाई दलाच्या एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्टचा निकाल जाहीर Rojgar News

IAF 2 result 2021: हवाई दलाने ((Air Force Common Admission Online Test, AFCAT 2 2021) जाहीर केला आहे. भारतीय हवाई दलाने (IAF)आज १७ सप्टेंबर २०२१ रोजी AFCAT 2 2021 चा निकाल अधिकृत वेबसाइट वर जाहीर केला. उमेदवार त्यांचे स्कोअरकार्ड तपासण्यासाठी आवश्यक तपशील भरून निकाल तपासू शकतात. AFCAT 2 2021 परीक्षा २८, २९ आणि ३० ऑगस्ट २०२१ या कालावधीत घेण्यात आली. शेवटी निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण कालावधी पूर्ण करावा लागेल. उड्डाण आणि तांत्रिक शाखांसाठी ७४ आठवडे आणि नॉन टेक्निकल शाखांच्या बाबतीत प्रशिक्षण कालावधी ५२ आठवडे असेल. मात्र सेवेच्या आवश्यकतेमुळे हा कालावधी बदलू शकतो. महत्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे - AFCAT परीक्षेची तारीख - २८, २९, ३० ऑगस्ट २०२१ AFCAT निकाल जाहीर- १७ सप्टेंबर २०२१ AFCAT निकाल 2021: निकाल कसा तपासायचा? AFCAT निकाल तपासण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट afcat.cdac.in ला भेट द्या. त्यानंतर मुख्यपृष्ठावर, 'उमेदवार लॉगिन' विभागात 'AFCAT 02/2021' वर क्लिक करा. आता तुम्ही नव्या पेजवर जाल. त्यानंतर नोंदणी क्रमांक वापरून लॉगिन करा. आता निकाल दिसेल. त्यानंतर निकाल डाऊनलोड करा, पुढील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या. एफसीएटी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीसाठी उपस्थित राहावे लागेल. त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना फ्लाइंग अँड ग्राउंड ड्यूटी (टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल) शाखांमध्ये ग्रुप ए ऑफिसरमध्ये भरती केले जाईल. या भरती प्रक्रियेअंतर्गत विविध पदांवर एकूण ३३४ रिक्त पदांची भरती केली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी अर्जदारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Z87jOr
via nmkadda

0 Response to "IAF AFCAT 2 result 2021: हवाई दलाच्या एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्टचा निकाल जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel