ICSIकडून CS जून २०२१ फाऊंडेशन परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर Rojgar News

ICSIकडून CS जून २०२१ फाऊंडेशन परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर Rojgar News

ICSI : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने जून 2021 सत्रात होणाऱ्या फाउंडेशन कोर्स परीक्षांसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. आयसीएसआय जून सत्र परीक्षेत बसणारे उमेदवार प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. यासाठी, विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जावे लागेल. होमपेजवर दिलेल्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर, नवीन पेजवर लॉगिन तपशील भरा आणि सबमिट करा. यानंतर विद्यार्थी जून सत्र प्रवेशपत्र २०२१ डाउनलोड करू शकतील. आयसीएसआय सीएस फाउंडेशन प्रवेशपत्र २०२१ मध्ये विद्यार्थ्यांचे नाव आणि रोल नंबर, परीक्षेचा तपशील, विषय, परीक्षा केंद्राचा कालावधी, परीक्षा केंद्राचे नाव आणि पत्ता यासारखे तपशील असतील. तसेच, परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सूचनांचा उल्लेख संस्थेच्या प्रवेशपत्रात करण्यात आला आहे. भारतीय कंपनी सेक्रेटरी संस्थेद्वारे फाउंडेशन कोर्स जून २०२१ सत्रासाठी लॅब/सेंटर आधारित परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. १३ आणि १४ ऑगस्ट २०२१ रोजी 'रिमोट प्रोक्टोरिंग' माध्यमातून झालेल्या परीक्षांमध्ये बसू शकले नव्हते अशा उमेदवारांसाठी ही परीक्षा आहे. उमेदवारांसाठी सूचना, सेल्फ डिक्लरेशन फॉर्म आणि प्रवेशपत्र डाउनलोड लिंक संस्थेतर्फे उमेदवारांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवण्यात आली आहे. ICSI ने जाहीर केलेल्या नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, जर विद्यार्थ्यांना त्यांच्या इनबॉक्समध्ये ईमेल न मिळाल्यास तो जंक मेल किंवा स्पॅम फोल्डरमध्येही तपासावा. विद्यार्थी नोटीसमध्ये दिलेल्या लिंकवरून देखील प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yQDWfB
via nmkadda

0 Response to "ICSIकडून CS जून २०२१ फाऊंडेशन परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel