Advertisement
Architecture : आयआयटी रुरकी ही देशातील सर्वोत्तम ठरली आहे. एनआयआरएफ रँकिंगमध्ये, रूरकीने आयआयटी खडगपूरला मागे टाकून पहिला क्रमांक मिळवला आहे. या यादीतील दुसरा क्रमांक एनआयटी कालीकटने पटकावला आहे. ही संस्था गेल्यावर्षीच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होती. चौथ्या स्थानावर स्कूल ऑफ प्लॅनिंग अॅण्ड आर्किटेक्चर दिल्ली आणि पाचव्या स्थानी सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल प्लानिंग अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, अहमदाबाद ही संस्था आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी NIRF यादी जाहीर केली. या यादीमध्ये पहिल्यांदाच रिसर्च ही कॅटेगरी आणण्यात आली आहे. एनआयआरएफ आर्किटेक्चर रँकिंग 2021: देशातील टॉप ५ संस्था IIT रुरकी () एनआयटी कालीकट IIT खरगपूर स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर, दिल्ली सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल प्लानिंग अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, अहमदाबाद त्याचबरोबर डेंटल कॉलेजच्या रँकिंगमध्ये स्थान मिळविणाऱ्या संस्थांमध्ये मणिपाल कॉलेज ऑफ डेंटल सायन्स, उडुपी पहिल्या क्रमांकावर, डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ, पुणे दुसऱ्या क्रमांकावर, तर सविता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्सेस, चेन्नई तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर मौलाना आझाद इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, दिल्ली चौथ्या क्रमांकावर आणि किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी, लखनऊ पाचव्या क्रमांकावर आहे. एकूण विद्यापीठे, इंजिनीअरिंग संस्था, महाविद्यालये, मॅनेजमेंट संस्था, फार्मसी, मेडिकल, आर्किटेक्चर, लॉ अशा विविध अभ्यासक्रमांच्या संस्थांच्या बाबतीत हे रँकिंग केले जाते. संस्थांमधील शिकवणी, सोयी-सुविधा, संशोधन, पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आदी विविध विविध निकषांवर ही क्रमवारी दिली जाते. '११ कॅटगरीमधील एनआयआरएफ रँकिंग २०२१ जाहीर करताना मला आनंद होत आहे. मी सर्व रँकिंग मिळालेल्या संस्थांचे अभिनंदन करतो. आज देशात ५० हजारांहून अधिक उच्च शिक्षण संस्था आणि ५० दशलक्ष विद्यार्थी आहेत. या सर्वांसाठी रँकिंग महत्त्वाचे आहे असे धर्मेंद्र प्रधान म्हणाले. या वर्षीच्या एनआयआरएफ रँकिंग २०२१ मध्ये आयआयटी मद्रास पुन्हा देशातील सर्वोत्तम संस्था ठरली आहे. विद्यापीठ श्रेणीमध्ये, आयआयएससी बंगळुर या वर्षी पहिल्या स्थानावर आहे आणि जेएनयू दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचप्रमाणे, आयआयटी मद्रास ही इंजिनीअरिंग कॅटगरीतील देशातील सर्वोत्तम संस्था ठरली आहे. त्यानंतर आयआयटी दिल्ली आणि त्यानंतर आयआयटी मुंबईचा क्रमांक लागतो. एनआयआरएफ रँकिंग २०२१ टॉप १० कॅटेगरी एनआयआरएफ रँकिंग २०२१ एकूण १० कॅटेगरीमध्ये जाहीर करण्यात आली आहे. या टॉप कॅटेगरीमध्ये विद्यापीठ, मॅनेजमेंट, महाविद्यालय, फार्मसी, वैद्यकीय, इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर, लॉ, आणि एआरआयआयए (इनोव्हेशन अचीव्हमेंट्सवरील संस्थांची अव्वल रँकिंग) यांचा समावेश आहे. नॅशनल इंस्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्वीकारून २९ सप्टेंबर २०१५ रोजी लाँच केले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ttnQaP
via nmkadda