एसएससी सीजीएल आणि सीएचएसएल परीक्षांच्या निकालांची तारीख जाहीर Rojgar News

एसएससी सीजीएल आणि सीएचएसएल परीक्षांच्या निकालांची तारीख जाहीर Rojgar News

CGL CHSL Result Date Udate: एसएससी सीजीएल आणि सीएचएसएल परीक्षांच्या निकालांची तारीख जाहीर झाली आहे. कर्मचारी निवड आयोगाने यावर्षी आयोजित केलेल्या विविध स्पर्धा परीक्षांच्या संभाव्य तारखांची घोषणा केली आहे. नोटिफिकेशननुसार, एसएससी सीएचएसएल २०१८ फायनल परीक्षेचा निकाल ३० सप्टेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. याव्यतिरिक्त SSC CGL 2020 टियर १ परीक्षेचा निकाल ११ डिसेंबर २०२१ रोजी जाहीर केला जाणार आहे. यापूर्वी आयोगाने सीजीएलच्या घोषणेची तारीख ३१ डिसेंबर असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण आता ही तारीख बदलण्यात आली आहे. एसएससीने अलीकडेच प्रोव्हिजनल आन्सर-की देखील जारी केली होती. लवकरच फायनल आन्सर-की देखील जारी करण्यात आली आहे. कंबाइंड हायर सेकेंडरी (१०+२) लेवल २०१९ टियर II परीक्षा आणि सीएचएसएल २०२० टियर १ परीक्षेचा निकाल अनुक्रमे ३० सप्टेंबर आणि ३० नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. आयोगाच्या अधिसूचनेनुसार, दिल्ली पोलीस विभागात सब इन्स्पेक्टर आणि सीएपीएफ परीक्षा २०२० (पीईटी/पीएसटी) चा निकाल ३० सप्टेंबर रोजी घोषित केला जाईल, तर दिल्ली पोलीस मध्ये कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव) पुरुष आणि महिला परीक्षा २०२० चा अंतिम निकाल ३१ ऑक्टोबर रोजी घोषित केला जाणार आहे. निकालाची सर्व माहिती उमेदवार अधिकृत वेबसाइट वर पाहू शकतील. आयोगाने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२१ या महिन्यात आयोजित होणाऱ्या सर्व विविध परीक्षा / स्किल टेस्टचे टाइमटेबल देखील जारी केलं आहे. शेड्युलनुसार, एसएससी सीएचएसएल २०१९ स्किल टेस्ट ३ नोव्हेंबर रोजी आयोजित केली जाईल. दिल्ली पोलीस एसआय भरतीसाठी होणारी परीक्षा पेपर २ चे आयोजन ८ नोव्हेंबर रोजी केले जाणार आहे. कॉन्स्टेबल जीडी परीक्षा १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२१ दरम्यान आयोजित केली जाणार आहे. याव्यतिरक्त भरतीसंबंधी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देता येईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2X3T5Ns
via nmkadda

0 Response to "एसएससी सीजीएल आणि सीएचएसएल परीक्षांच्या निकालांची तारीख जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel