NIRF Ranking 2021: एनआयआरएफ रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात ११ वे Rojgar News

NIRF Ranking 2021: एनआयआरएफ रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात ११ वे Rojgar News

NIRF Ranking 2021: 'ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट' म्हणजेच पूर्वेचे ऑक्सफर्ड असं बिरुद मानाने मिरवणाऱ्या पुणे विद्यापीठाचं स्थान यंदाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेमवर्क रँकिंग २०२१ (NIRF 2021) मध्ये घसरलं आहे. देशातील टॉप १० विद्यापीठांमधील स्थान यंदा पुणे विद्यापीठाला टिकवता आलेलं नाही. पुणे विद्यापीठाचा क्रमांक यंदा ११ वा आहे. गेली दोन वर्षे सातत्याने हे विद्यापीठ पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये स्थान मिळवत होतं. दुसरीकडे मुंबई विद्यापीठ या रँकिंगमध्ये ७१ व्या स्थानी आहे. ओव्हरऑल रँकिंगमध्ये २० व्या, तर मुंबई विद्यापीठ ९६ व्या स्थानी आहे. २०१९ या पुणे विद्यापीठाने एनआयआरएफ रँकिंगमध्ये दहावे स्थान पटकावले होते. त्यानंतर गेल्या वर्षी आपले स्थान आणखी उंचावत पुणे विद्यापीठ नवव्या स्थानी पोहोचले होते. मात्र यंदा विद्यापीठाला पहिल्या दहा सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये आपले स्थान टिकवता आलेले नाही. यंदा अलिगड मुस्लिम विद्यापीठ दहाव्या स्थानी आहे. दरम्यान, पुण्यातील डी.वाय. पाटील विद्यापीठाने देशातील सर्वोत्तम पाच दंत महाविद्यालयांमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षी हे विद्यापीठ या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी २०२१ वर्षाचे राष्ट्रीय संस्थात्मक नामांकन (NIRF) रँकिंग जाहीर केले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास ( )भारतातील सर्वोत्तम संस्था ठरली आहे. सलग तिसऱ्या वर्षी आयआयटी मद्रासने अव्वल स्थान मिळवले आहे. आयआयटी मद्रासला मध्ये 'ओव्हरऑल' आणि 'इंजिनीअरिंग' श्रेणीमध्ये भारतात पहिल्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. तब्बल सात आयआयटींनी यादीत स्थान मिळवले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nhx7Sf
via nmkadda

0 Response to "NIRF Ranking 2021: एनआयआरएफ रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात ११ वे Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel