Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०१, २०२१ WIB
Last Updated 2021-09-01T15:44:05Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

विद्यार्थ्यांना नावीन्याची ओढ; पारंपरिक अभ्यासक्रमांना मागणी कमी Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान या पारंपरिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे विद्यापीठाने नुकत्याच सादर केलेल्या अहवालातील आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण आणि कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे याच अहवालातून दिसून आले आहे. अभियांत्रिकी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याचेही स्पष्ट झाले आहे. विद्यापीठाकडून गेल्या चार वर्षांत विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विद्याशाखांत घेतलेल्या प्रवेशांची आकडेवारी जाहीर केली आहे. यात गेल्या चार वर्षांत पारंपरिक अभ्यासक्रमांचे प्रवेश घटत चालल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या पुणे, नाशिक, नगर आणि सिल्वासा अशा चार विभागांमधील विद्यार्थ्यांची ही माहिती आहे. पारंपरिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटत असली, तरी व्यवसायाभिमुख आणि कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम शिकण्यावर विद्यार्थी भर देत असल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माण (फार्मसी), कायदा, व्यवस्थापन या विद्याशाखांना प्रवेश घेणारे विद्यार्थी वाढत असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी अभियांत्रिकीसाठी ५४ हजार ४९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. दोन वर्षांत या प्रवेशांत २१ हजारांनी वाढ झाली आहे. या व्यतिरिक्त कायदा, व्यवस्थापन आणि औषधनिर्माण या क्षेत्रांमध्येही प्रवेश घेणारे विद्यार्थी सातत्याने वाढत आहेत. विद्यापीठाच्या अहवालातील प्रवेशांची आकडेवारी विद्याशाखा -- वर्ष २०१८ -- वर्ष २०१९ -- वर्ष २०२० कला -- ६७,५६७ -- ६२,१६५ -- ५२,४२५ वाणिज्य -- ८९,२४६ -- ८२,९५० -- ७७,६८९ विज्ञान -- ४९,१११ -- ४९,२७२ -- ४७,९१२ अभियांत्रिकी -- ३३,३७४ -- ५०,४३८ -- ५४,४९६ कायदा -- ६,८८६ -- ७,०५२ -- ७,५३४ व्यवस्थापन --१३,६८९ -- १४,४१२ -- १५,९४६ औषधनिर्माण -- ५,२६० -- ६,००१ -- ७,५५२ 'वाणिज्य'ला सर्वाधिक प्रवेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांत सर्वाधिक विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेला प्रवेश घेतले आहेत. गेल्या दोन वर्षांत वाणिज्य शाखेतील प्रवेशसंख्या घटत असली, तरी इतर विद्याशाखांच्या तुलनेत सर्वाधिक विद्यार्थी वाणिज्य शाखेचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०२०मध्ये वाणिज्य शाखेत सर्वाधिक म्हणजेच ७७ हजार ६८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3t3O3fT
via nmkadda