वैद्यकीय प्राध्यापकांचा २ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा Rojgar News

वैद्यकीय प्राध्यापकांचा २ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा Rojgar News

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील अस्थायी प्राध्यापकांची सेवा नियिमत करण्याची मागणी आश्वासन देऊनही पूर्ण न झाल्यामुळे येत्या २ ऑक्टोबरपासून मुंबईतील आझाद मैदान येथे करण्याचा इशारा महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशनने दिला आहे. कोव्हिड काळात राज्यातील शासकीय वैद्यकीय व महाविद्यालयाकील रुग्णालयातील अस्थायी स्वरूपात काम करणाऱ्या सहायक प्राध्यापकांनी अहोरात्र रुग्णसेवा दिली होती. या कामाची दखल घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी २ वर्षावरील सर्व अस्थायी प्राध्यापकांची सेवा नियमित करण्याचे आश्वासन संघटनेला दिले होते. मात्र आता कोव्हिडची लाट सौम्य झाल्याने या प्राध्यपकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. एप्रिल महिन्यात याच प्राध्यापकांनी विवध मागण्यांसाठी सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी राज्यात करोनाची दुसरी लाट सुरू होती. कोव्हिडच्या काळात डॉक्टरच रजेवर गेल्यास त्याचा फटका आरोग्यसेवेला बसण्याची भीती होती. त्यावेळी देण्यात आलेल्या आश्वासनामुळे आंदोलन मागे घेण्यात आले होते. भाजप-सेना युतीच्या काळात १९९५पासून राज्यात वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने विभागीय मंडळाच्या माध्यमातून अस्थायी नियुक्त्या करणे सुरू केले. आज राज्यात २० शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये ४५० पेक्षा अधिक प्राध्यापक अस्थायी स्वरूपात कार्यरत आहेत. २००७ साली काँग्रेस सरकारच्या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील अस्थायी वैद्यकीय प्राध्यापकांची सेवा नियमित करण्यात आली होती. पण, त्यावेळी बाकी ठिकाणी कार्यरत प्राध्यापकांची सेवा नियमित करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना नियमित करावे, या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zyAl6u
via nmkadda

0 Response to "वैद्यकीय प्राध्यापकांचा २ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel