Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २१, २०२१ WIB
Last Updated 2021-09-21T08:43:11Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

पवनहंस लिमिटेडमध्ये डिप्लोमाधारक तरुणांना नोकरीची संधी Rojgar News

Advertisement
Pawan Hans Limited : भारत सरकारअंतर्गत येणाऱ्या पवनहंस लिमिटेडमध्ये ट्रेनी पदांची भरती केली जात आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, पगार यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. निवड झालेल्या उमेदवाराला एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर, प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञांसोबत ज्युनिअर टेक्निशियन लेव्हल १ मध्ये पुन्हा तीन वर्षांच्या कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्ट केले जाईल. एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यावर, निवडलेल्या उमेदवारांना कंपनीच्या आवश्यकतेनुसार भारतात कोठेही भरती केले जाऊ शकते. रिक्त जागा पवनहंस लिमिटेडने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार डायनामिक आणि रिझल्ट ओरिएंडेट उमेदवारांना प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ म्हणून भरती केले जाणार आहे. B1(A&C) पदाच्या १० जागा तर B2( Avionics) पदाच्या ८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. एससी, एसटी, ओबीसी उमेदवार आणि अपंग व्यक्तींसाठी शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत शिथिलता देण्यात येईल. शैक्षणिक आर्हता यासाठी उमेदवारांकडे मेकॅनिकल/एरोनॉटिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन यापैकी एकात डिप्लोमा असणे गरजेचे आहे. एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थेतून तीन वर्षे अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. किंवा डीजीसीए मान्यताप्राप्त संस्थेतून एएमई अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. किंवा DGCA मान्यताप्राप्त संस्थेकडून B1.3 किंवा B2 श्रेणीतील विमान अभियांत्रिकी देखभाल अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. अनुभव यासाठी उमेदवाराकडे परिवहन विमान किंवा हेलिकॉप्टरच्या देखभालीवर एक वर्षाचा पात्रता अनुभव असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा १ ऑक्टोबर २०२१ रोजी उमेदवाराची वयाची २५ वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. पगार निवड झालेल्या उमेदवारास दरमहा १६ हजार ५०० रुपये पगार दिला जाईल. ट्रेनी भरतीसंदर्भातील नवीन अपडेट्ससाठी अधिकृत वेबसाइट www.pawanhans.co.in ला भेट देणे गरजेचे आहे. भरती संबंधित इतर सूचना आणि ताजी अपडेट वेबसाइटवर दिली जाईल. महत्वाचा तपशील अर्ज दिलेल्या नमुन्यात नसल्यास, अपूर्ण, स्वाक्षरी नसलेले, वय, जात/वर्ग, पात्रता, अनुभव इत्यादी कागदपत्रांची पूर्तता न केल्या किंवा शेवटच्या तारखेनंतर अर्ज प्राप्त झाल्यास अर्ज नाकारले जाऊ शकतात. अपूर्ण / अपात्र / अपात्र अर्ज उमेदवारांना कळविल्याशिवाय नाकारले जातील. उमेदवारांनी त्यांचा अर्ज बंद लिफाफ्यातून पाठवायचा आहे. अर्जावर 'प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ पदासाठी अर्ज' असे नमूद करायचे आहे. ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत आलेल्या अर्जांचा विचार केला जाईल. उप. महाव्यवस्थापक (HR&A),पवन हंस लिमिटेड, जुहू एरोड्रोम, एस.व्ही. रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई- ४०००५६ या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EFWHH0
via nmkadda