दहावीनंतरच्या डिप्लोमा प्रवेशांची पहिली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट; प्रवेश निश्चिती लवकरच Rojgar News

दहावीनंतरच्या डिप्लोमा प्रवेशांची पहिली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट; प्रवेश निश्चिती लवकरच Rojgar News

एसएससी पदविका प्रवेशासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने (DTE) गुणवत्ता यादी १३ सप्टेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध केली. उमेदवार आज अधिकृत वेबसाइट वर CAP च्या पहिल्या फेरीची प्रोव्हिजनल यादी पाहू शकतात. उमेदवारांच्या लॉगिनद्वारे पर्याय फॉर्म सबमिट आणि कन्फर्म करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर होती. एसएससी डिप्लोमा तात्पुरते वाटप झाल्यावर, उमेदवार १९ ते २२ सप्टेंबर २०२१ पर्यंत त्यांच्या लॉगिनद्वारे अलॉट केलेल्या संस्थेतील आपला प्रवेश निश्चित करू शकतील. उमेदवारांनी त्यांच्या लॉगिनद्वारे कॅपच्या पहिल्या फेरीतील त्यांना वाटप केलेल्या जागांचे सत्यापन करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी याचीही खात्री करावी की त्यांचे दावे सिद्ध करण्यासाठी संबंधित कागदपत्रे योग्य आहेत. तात्पुरती डीटीई मेरिट लिस्ट २०२१ आणि पहिल्या फेरीसाठी पोस्ट एसएससी डिप्लोमाची तात्पुरती अलॉटमेंट डाऊनलोड करण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया खाली शेअर केली आहे. डीटीई महाराष्ट्र गुणवत्ता यादी २०२१: पोस्ट एसएससी डिप्लोमा तात्पुरती मेरिट लिस्ट कशी पाहाल? - तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र - dtemaharashtra.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या . - होमपेजवर उपलब्ध 'पोस्ट एसएससी डिप्लोमा प्रवेश 2021-22' लिंकवर क्लिक करा. - ' नोंदणीकृत उमेदवाराचे लॉगिन ' वर क्लिक करा आणि लॉग इन करण्यासाठी अर्ज आयडी आणि पासवर्ड आदि माहिती भरा. पोस्ट एसएससी डिप्लोमा तात्पुरती अलॉटमेंट यादी तपासा आणि डाऊनलोड करा. - आवश्यकतेनुसार दुरुस्ती करा आणि वाटप केलेली सीट कन्फर्म करा. - पोस्ट एसएससी डिप्लोमा प्रोव्हिजनल अॅलॉटमेंटमध्ये कोणतीही त्रुटी आढळलेल्या उमेदवारांनी त्याच्या लॉगिनद्वारे ई-स्क्रुटीनी किंवा फिजिकल स्क्रुटीनी मोडद्वारे तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. जे त्यांच्या वाटप केलेल्या जागांवर समाधानी आहेत त्यांनी सीट स्वीकृती शुल्कासह ते फ्रीझ केले पाहिजे. उमेदवाराने त्यांचा पर्याय एकदा काळजीपूर्वक वापरला पाहिजे, ते नंतरच्या फेऱ्यांमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. १३ सप्टेंबर २०२१ रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली. वाटप केलेल्या कॉलेजला जाऊन प्रवेश निश्चित करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०२१ आहे. डीटीई महाराष्ट्र मेरिट लिस्ट २०२१ आणि पोस्ट एसएससी डिप्लोमा प्रोव्हिजनल अलॉटमेंटवर अधिक अपडेट मिळवण्यासाठी उमेदवाराचे लॉगिन तपासत रहा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CrEawa
via nmkadda

0 Response to "दहावीनंतरच्या डिप्लोमा प्रवेशांची पहिली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट; प्रवेश निश्चिती लवकरच Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel