जाणून घ्या जर्मनीतील शिक्षणसंधी Rojgar News

जाणून घ्या जर्मनीतील शिक्षणसंधी Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, पुणे जर्मनीतील उच्च शिक्षणाच्या संधींविषयी माहिती देणारे ऑनलाइन मार्गदर्शन सत्र (फेसबुक लाइव्ह) येत्या शनिवारी (४ सप्टेंबर) सायंकाळी पाच वाजता आयोजिण्यात आले आहे. 'स्टडी अँड रिसर्च इन जर्मनी' असे या सत्राचे शीर्षक आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'प्लॅनेट कॅम्पस' या उपक्रमांतर्गत जर्मन अॅकॅडेमिक एक्स्चेंज सर्व्हिस अर्थात 'डाड'तर्फे या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. पदवी शिक्षणानंतर जर्मनीमध्ये उपलब्ध असलेल्या मास्टर्स अभ्यासक्रमांबाबत या सत्रात माहिती दिली जाईल. विविध विद्याशाखांमधील अभ्यासक्रमांबाबत या वेळी मार्गदर्शन केले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून संशोधनासाठी जर्मनीत जायचे आहे, अशांसाठी जर्मनीतील संशोधनसंधींबाबतही माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर 'डाड'तर्फे दिल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्त्यांची माहितीही विद्यार्थी-पालकांना मिळू शकणार आहे. 'डाड'च्या पुण्यातील माहिती केंद्राच्या प्रादेशिक अधिकारी धनश्री देवधर आणि गिरिजा जोशी; तसेच मुंबईतील 'डाड' माहिती केंद्राच्या अधिकारी शुभदा चौधरी या सत्रात विद्यार्थी-पालकांना मार्गदर्शन करतील. वेळापत्रक मार्गदर्शन सत्र : स्टडी अँड रिसर्च इन जर्मनी तारीख : शनिवार, ४ सप्टेंबर वेळ : सायंकाळी ५ फेसबुक लाइव्हसाठी लिंक : https://ift.tt/3mQ0lHI


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yEd3vs
via nmkadda

0 Response to "जाणून घ्या जर्मनीतील शिक्षणसंधी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel