Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०२, २०२१ WIB
Last Updated 2021-09-02T08:43:26Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकिंग जाहीर, ३ भारतीय विद्यापीठांचा टॉप ४०० मध्ये समावेश Rojgar News

Advertisement
World University Ranking 2022: बेंगळुर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) यासह तीन भारतीय विद्यापीठांनी टाइम्स हायर एज्युकेशन (THE) वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२२ मध्ये टॉप ४०० सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये स्थान मिळवले आहे. कोणालाही २०० ग्लोबल लीग टेबलमध्ये स्थान मिळाले नाही. IISc ला गेल्या वर्षीप्रमाणे ३०१ ते ३५० या गटात स्थान मिळाले. भारतीय औद्योगिक संस्था रोपडने ३५१ ते ४०० च्या गटात आपले स्थान कायम राखले आहे. त्याचवेळी, म्हैसूर येथील खासगी विद्यापीठ जेएसएस अकादमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चने जागतिक क्रमवारीत पदार्पण केले आणि ३५१ ते ४०० च्या गटात स्थान मिळवले. आयआयटी इंदूरला ४०१ ते ५०० गटात स्थान मिळाले आहे. अलगप्पा विद्यापीठ आणि थापर विद्यापीठ ५०१ ते ६०० या गटात आहेत. यादीतील पहिल्या २०० संस्थांना वैयक्तिक रँकिंग क्रमांक दिले जातात आणि उर्वरित संस्था गटांमध्ये सूचीबद्ध केले जातात. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU), दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठ (DTU), जामिया मिलिया इस्लामिया आणि पंजाब विद्यापीठ यासह दहा भारतीय विद्यापीठांना ६०१ ते ८०० गटामध्ये आहेत. तर दिल्ली विद्यापीठ ८०० ते १०० बँडवर घसरले आहे. जे मागील वर्षी ६०१ ते ८०० च्या रँकिंगपेक्षा खाली होते. भारतीय विद्यापीठे हळूहळू त्यांचे संशोधन, उद्धरण आणि जागतिक संशोधन सहयोग गुणांसह अध्यापन आणि प्रकाशन स्कोअर सुधारत आहेत असे टाइम्स हायर एज्युकेशनने म्हटले आहे. आम्ही आकडेवारीमध्ये पाहत आहोत की, गेल्या पाच वर्षांमध्ये, भारतातील विद्यापीठांनी जागतिक सरासरीच्या तुलनेत जागतिक विद्यापीठ क्रमवारी संकलित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बहुतेक मेट्रिक्समध्ये सुधारणा केली आहे असे ईमेल केलेल्या प्रतिसादात, THE ने म्हटले आहे. करोना लसीच्या जागतिक शोधाचा मार्ग मोकळा केलेल्या यूकेच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने सलग सहाव्या आपले वर्षी अव्वल स्थान कायम राखले आहे. त्यानंतर कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, हार्वर्ड युनिव्हर्सिटी, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचा क्रमांक लागतो. यूकेच्या केंब्रिज विद्यापीठाला पहिल्या ५ क्रमांकामध्ये स्थान देण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DHBITq
via nmkadda