राज्यातील शाळा-कॉलेज सुरू करण्याचा निर्णय केव्हा; नेमकं काय म्हणाले अजित पवार? Rojgar News

राज्यातील शाळा-कॉलेज सुरू करण्याचा निर्णय केव्हा; नेमकं काय म्हणाले अजित पवार? Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, मुंबई Schools Colleges Reopening Update: राज्यातील शाळा महाविद्यालये सुरू करण्याबाबत राज्य सरकार लवकरच भूमिका घेणार असून, राज्यात ऑक्टोबरमधील करोना साथीच्या रोगाची परिस्थिती पाहून याबाबत पुढचे पाऊल उचलण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy CM ) यांनी गुरुवारी येथे सांगितले. याबाबत २ ऑक्टोबरपर्यंत काय परिस्थिती आहे ते बघायचे. त्यानंतर महाविद्यालय टप्याटप्याने सुरू करता येईल काय यावर चर्चा होऊन, त्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. राज्यात करोना साथरोगाचा प्रादुर्भाव कमी होत असला, तरी काही ठिकाणी करोनाचे रुग्ण वाढत आहेत. करोना लसीकरणावर भर देण्यात येत असून, राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर राज्यात शाळा, महाविद्यालये सुरू होणार का, असा प्रश्न विचारता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले. करोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून ऑनलाइन वर्गात बसून कंटाळलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. राज्यात दिवाळीनंतर शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच आढावा घेऊन अंतिम निर्णय होईल. तसेच शाळांबाबत लहान मुलांच्या लसी आल्या की त्यांचे लसीकरण करायचे आणि दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याची आमची मानसिकता आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3i2tnR2
via nmkadda

0 Response to "राज्यातील शाळा-कॉलेज सुरू करण्याचा निर्णय केव्हा; नेमकं काय म्हणाले अजित पवार? Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel