School Reopen: दिल्लीत आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सध्या बंदच Rojgar News

School Reopen: दिल्लीत आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सध्या बंदच Rojgar News

Reopening 2021: दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने (DDMA) ज्युनियर वर्गांसाठी (नर्सरी ते आठवी पर्यंत) शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. डीडीएमएने जाहीर केलेल्या सुचनेनुसार सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन वर्ग सध्या बंदच राहणार आहेत. विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन माध्यमातून सुरु राहणार आहे. डीडीएमएने दिल्लीतील सिनीअर वर्गातील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी १ सप्टेंबरपासून आणि मध्यम वर्गातील (सहावी ते आठवी) विद्यार्थ्यांसाठी ८ सप्टेंबरपासून शाळा सुरु करण्याची शिफारस केली होती. यानंतर दिल्ली शिक्षण विभागाने डीडीएमएच्या निर्देशांनुसार शाळा सुरु करत नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात येण्याची परवानगी दिली. असे असले तरीही दिल्ली सरकारने सहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत येण्याची परवानगी दिली नाही. नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाल्यानंतर परिस्थिती पाहून सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याच्या डीडीएमएच्या शिफारसींवर विचार केला जाईल असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले होते. दिल्लीच्या शाळांमध्ये सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी डीडीएमए लवकरच विशेषज्ञांसोबत बैठक घेणार आहे. या बैठकीत सहावी ते आठवीपर्यंत आणि त्यानंतर ज्युनियर वर्गासाठी (नर्सरी ते पाचवी) शाळांमध्ये ऑफलाइन वर्ग सुरु करण्याबाबत विचार केला जाणार आहे. दिल्लीच्या पब्लिक स्कूल असोसिएशनतर्फे ज्युनिअर वर्गांच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष वर्गात सवलत देण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली. आता सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यास काय हरकत आहे? असा प्रश्न दिल्ली स्टेट पब्लिक स्कूल मॅनेजमेंट असोशिएशन (डीएसपीएसएमए) च्या अध्यक्षांनी उपस्थित केला. 'आम्ही सरकारच्या आदेशाची वाट पाहत आहोत. जर २४ सप्टेंबरपर्यंत निर्णय झाला नाही तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर आंदोलन केले जाईल' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lszcbA
via nmkadda

0 Response to "School Reopen: दिल्लीत आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सध्या बंदच Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel