Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २९, २०२१ WIB
Last Updated 2021-09-29T05:43:26Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

UPSC CSE २०२० परीक्षेच्या सर्व उमेदवारांचे गुण जाहीर,'असे' तपासा Rojgar News

Advertisement
CSE 2020: केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२० मध्ये उपस्थित झालेल्या सर्व उमेदवारांचे गुण जाहीर केले आहेत. CSE 2021 Main मधील यशस्वी आणि अयशस्वी उमेदवारांसाठी आयोगाने स्वतंत्रपणे गुण जाहीर केले आहेत. नागरी सेवा परीक्षा २०२० मध्ये उपस्थित झालेले उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर दिलेल्या लिंकवरून किंवा बातमीखाली दिलेल्या थेट लिंकवरून त्यांचे गुण तपासू शकतात. या लिंकवरून तपासा गुण केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) २४ सप्टेंबर रोजी नागरी सेवा परीक्षा २०२० चा अंतिम निकाल जाहीर केला होता. यानंतर, UPSC ने श्रेणीनिहाय कटऑफ गुण जाहीर केले आहेत. सिव्हिल सर्व्हिसेस प्रीलिम्स, मेन्स आणि फायनल कटऑफ मार्क्स अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत. उमेदवार upsc.gov.in ला भेट देऊन गुण तपासू शकतात. दरम्यान वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या नोटिसनुसार, निकाल जाहीर झाल्यापासून १५ दिवसांच्या आत उमेदवारांचे गुण (गुण) जाहीर केले जातील. या स्टेप्स फॉलो करुन तपासा नागरी सेवा परीक्षा २०२० ची कटऑफ यादी कटऑफ यादी तपासण्यासाठी उमेदवारांनी UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट देणे आवश्यक आहे. होमपेजवरील एक्झाम सेक्शनमध्ये सिव्हिल सर्व्हिस परीक्षा २०२० लिंकवर क्लिक करा. आता एक नवीन पेज उघडेल. येथे कटऑफ लिंकवर क्लिक करा. आता पुन्हा तुमच्यासमोर एक नवीन पेज खुले होईल. येथे प्रीलिम्स, मेन आणि एकूण कटऑफ लिस्ट पीडीएफ स्वरूपात देण्यात आली आहे. उमेदवार कॅटगरीनुसार कटऑफ गुण तपासू शकतात. नागरी सेवा परीक्षा २०२० च्या अंतिम निकालानुसार एकूण ७६१ उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. ज्यामध्ये सामान्य श्रेणीसाठी २६३, ईडब्ल्यूएससाठी ८६, ओबीसीसाठी २२९, एससीसाठी १२२ आणि एसटी श्रेणीसाठी ६१ उमेदवार आहेत. याव्यतिरिक्त १५१ शिफारस केलेल्या उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून १० ऑक्टोबर २०२१ रोजी नागरी सेवा प्राथमिक परीक्षा २०२१ घेण्यात येणार आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार परीक्षा मे महिन्यात घेण्यात येणार होती. जी करोना साथीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. यूपीएससी नागरी सेवा परीक्षेद्वारे निवडलेल्या उमेदवारांची नियुक्ती भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि केंद्रीय सेवा गट अ आणि गट ब मध्ये केली जाते. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात तपशीलवार माहिती मिळू शकेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Y0LEYt
via nmkadda