UPSC Result: राज्यातून पहिली येणाऱ्या मृणाली जोशीने सांगितले यशाचे गमक Rojgar News

UPSC Result: राज्यातून पहिली येणाऱ्या मृणाली जोशीने सांगितले यशाचे गमक Rojgar News

Result: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून २०२०मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ७६१ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे. यामध्ये नागपूरची हिने राज्यातून पहिली येण्याचा मान पटकावला आहे. आपल्या यशाचे गमक परीक्षेत देशात ३६ व्या क्रमांकाने आणि राज्यात पहिल्या आलेल्या मृणाली जोशीने सांगितले आहे. वाचन, लिखाण, चित्रकला, स्वअभ्यास अशा छंदांमुळे यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवता आले असे मृणालीने सांगितले. माझ्या आई-वडिलांनी मला माझ्या आवडीप्रमाणे शिक्षण घेण्याची संधी दिल्याने आज सनदी अधिकारी म्हणून लोकसेवा करायची संधी मिळाल्याची प्रतिक्रिया तिने दिली. मृणालीने हे यश २४ व्या वर्षी मिळवले आहे. विशेष म्हणजे मृणालीने दुसऱ्या प्रयत्नात यश प्राप्त केले आहे. मृणालीने तिचे बारावीपर्यतचे शिक्षण अभिनव विद्यालयातून तर बीए (ईकॉनॉमिक्स) फर्ग्युसन महाविद्यालयातून २०१८ मध्ये पूर्ण केले आहे. मृणालीचे वडील अविनाश जोशी आणि मीनल जोशी हे दोघेही आयआयटीआयन आहेत. या परीक्षेमध्ये बिहारचा आणि आयआयटी मुंबईतून पदवीधर झालेला शुभम कुमार देशात पहिला आला आहे. अहमदनगरचा विनायक नरवडे देशात ३७वा आला आहे. ९५व्या क्रमांकावर विनायक महामुनी आहे. भोपाळच्या जागृती अवस्थीने दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर अंकिता जैननं तिसरा क्रमांक पटकावला आहे. मुलींमध्ये जागृती देशात पहिली आली आहे. २४ वर्षीय जागृतीने इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. २०२० साली यूपीएससीकडून घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. आयोगाने ८३६ जागांसाठी झोतलेल्या या परीक्षेतून ७६१ पात्र उमेदवार मिळाले आहेत. मुलींची संख्या वाढली यंदाच्या निकालात मुलींची संख्या वाढल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. अंतिम यादीत ५४५ पुरुष तर २१६ महिला उमेदवारांचा समावेश आहे. तर पहिल्या २५मध्ये १३ पुरुष आणि १२ महिलांचा समावेश आहे. याचबरोबर २५ उमेदवार हे दिव्यांग्य प्रवर्गातील आहेत. पहिल्या २५ आलेल्या विद्यार्थ्यांची पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण हे प्रामुख्याने आयआयटी, एनआयटी. बिट्स, एनएसयूटी, डीटीयू, मुंबई विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ अशा नामांकित संस्थांमधून झाले आहे, असे आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XJKrEc
via nmkadda

0 Response to "UPSC Result: राज्यातून पहिली येणाऱ्या मृणाली जोशीने सांगितले यशाचे गमक Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel