AICTE ची ५० हजार रुपयांची स्कॉलरशीप...निकष, नियम जाणून घ्या... Rojgar News

AICTE ची ५० हजार रुपयांची स्कॉलरशीप...निकष, नियम जाणून घ्या... Rojgar News

जर एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी AICTE मार्फत मान्यता प्राप्त डिग्री आणि डिप्लोमा अभ्यासक्रम शिकत असेल तर तो AICTE च्या SWANATH योजनेसाठी अर्ज करू शकतो. या अंतर्गत विद्यार्थ्याना वर्षातून ५० हजार रुपये इतकी स्कॉलरशीप मिळते. या योजनेंतर्गत एक हजार पदवी आणि एक हजार पदविका अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. पात्रता काय? अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (AICTE)SWANATH स्कीमनुसार अनाथ मुलं, कोविड-१९ मुळे ज्यांनी आपले आई-वडिल गमावले अशी मुलं, सैन्य आणि निमलष्करी दलातील शहीद सैनिकांची मुलं, अशी मुलं ज्यांच्या आई-वडिलांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशी सर्व मुलं-मुली या योजनेसाठी पात्र आहेत. या व्यतिरिक्त हे विद्यार्थी AICTE च्या मान्यता प्राप्त नियमित अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असायला हवेत. यासोबतच जर एखाद्या विद्यार्थ्याला केंद्र आणि राज्य सरकार किंवा AICTE च्या अन्य स्कॉलरशिप योजनेचा आधीपासूनच लाभ मिळत असेल तर असे विद्यार्थी या योजनेस पात्र नसतील. अर्ज कसा करावा? जे विद्यार्थी निकषांमध्ये बसतात, तेच या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या योजनेंचा लाभ जास्तीत जास्त चार वर्षांसाठी मिळतो. अर्जदारांचे आधार आणि बँक खाते लिंक असायला हवे. जेणेकरून ५० हजार रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यात पोहोचेल. ... तर अर्ज फेटाळला जाऊ शकतो AICTE ची मान्यता नसलेल्या विद्यापीठ किंवा महाविद्यालयातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा अर्ज फेटाळला जाऊ शकतो. अर्जदाराने ड्युअल डिग्रीला प्रवेश घेतला असेल तर अर्ज बाद होऊ शकतो. स्कॉलरशीप मिळाल्यावर दरवर्षी पुढील वर्गात गेल्याच प्रमाणपत्र जमा न केल्यासही अर्ज बाद होऊ शकतो. उत्पन्नाचं योग्य प्रमाणपत्र नसेल, तरीही अर्ज बाद ठरतो.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vlCLou
via nmkadda

0 Response to "AICTE ची ५० हजार रुपयांची स्कॉलरशीप...निकष, नियम जाणून घ्या... Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel