BMC रुग्णालयात विविध रिक्त जागांवर भरती, १ लाखापर्यंत मिळेल पगार Rojgar News

BMC रुग्णालयात विविध रिक्त जागांवर भरती, १ लाखापर्यंत मिळेल पगार Rojgar News

BMC Recruitment 2021: मुंबई महानगर पालिकेअंतर्गत येणाऱ्या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात विविध रिक्त पदांवर भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदभरतीसाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि इतर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीतून होणार आहे. शैक्षणिक पात्रता या भरतीअंतर्गत ह्रदयरोग विभागाअंतर्गत ३ जागा तर उरोशल्य चिकित्साशास्त्र विभागात एक जागा भरली जाणार आहे. या पदभरती अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक विभागातील पदे कंत्राटी तत्वावर भरली जाणार आहेत. या पदांसाठी उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे गरजेचे आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका (एम.डी पदवी, डीएनबी किंवा एमएस) असणे आवश्यक आहे. अनुभव या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ३ वर्षाचा शिक्षक पदाचा अनुभव असणे गरजेचे आहे. ही नियुक्ती कंत्राटी तत्वावर असून चार महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी नसेल.प्रत्येक चार महिन्यानंतर एक दिवस सेवाखंड देण्यात येईल. त्यानंतर पुनर्नेमणूक किंवा वैद्यकीय निवड मंडळातर्फे निवड यापैकी जे अगोदर होईल त्याप्रमाणे निवड होऊ शकते. ही नियुक्ती कंत्राटी पद्धतीने असल्यामुळे उमेदवाराला निवृत्तीवेतन योजना आणि भविष्यनिर्वाह निधी योजना लागू होणार नाही. तसेच उमेदवाराला पालिका सेवा आणि वर्तणूक नियम १९९९ देखील लागू होणार नाही. उमेदवाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ३८ वर्षांपेक्षा अधिक नसावे. मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सवलत देण्यात आली आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा १ लाखापर्यंत पगार देण्यात येईल. उमेदवारांसाठी १३ ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून २१ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३.३० पर्यंत अर्ज घेता येतील. दिलेल्या पत्त्यावर जाऊन अर्ज घेता येतील. खुल्या वर्गाकडून ३०० रुपये अधिक जीएसटी तर मागासवर्गाकडून २०० रुपये अधिक जीएसटी असा अर्ज शुल्क आकारण्यात येईल. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी , शीव, मुंबई-४०००२२ या पत्त्यावर यायचे आहे. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता थेट मुलाखतीतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ह्रदयरोग विभाग आणि उरोशल्य चिकित्साशास्त्र विभागात ही भरती होणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Z0jTQ3
via nmkadda

0 Response to "BMC रुग्णालयात विविध रिक्त जागांवर भरती, १ लाखापर्यंत मिळेल पगार Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel