Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २७ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २७, २०२१ WIB
Last Updated 2021-10-27T12:43:35Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CAT परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, 'या' स्टेप्स फॉलो करुन करा डाऊनलोड Rojgar News

Advertisement
2021: कॉमन अॅडमिशन टेस्ट ( Common Admission Test, CAT 2021) चे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वरून प्रवेशपत्र (IIM ) डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर उमेदवारांनी त्यातील स्वत:चे नाव, जन्मतारीख, अर्ज क्रमांक, श्रेणी, परीक्षा केंद्राचे नाव आणि पत्ता, परीक्षेचा दिवस आणि शिफ्टच्या वेळेसह सर्व माहिती तपासून घ्या. परीक्षेच्या दिवशी पाळल्या जाणार्‍या सर्व मार्गदर्शक सूचना प्रवेशपत्रावर दिल्या जातील. कॅट २०२१ परीक्षेचे आयोजन भारतीय व्यवस्थापन संस्था (Institute of Management, IIM Ahmedabad) अहमदाबाद द्वारे केले जाणार आहे. परीक्षा २८ नोव्हेंबर २०२१ रोजी आयोजित केली जाणार आहे. आयआयएम संस्थेद्वारे २०२१ चे आयोजन देशातील १५८ शहरात केलं जाणार आहे. या परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड विद्यार्थ्यांसाठी २७ ऑक्टोबर रोजी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध केले जाणार आहे. हॉल तिकीट जारी झाल्यानंतर आवश्यक ती माहिती भरून उमेदवार अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतील. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेचा निकाल जानेवारी २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे. CAT 2021 Admit Card: असे करा डाऊनलोड स्टेप १: सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर जा. स्टेप २: वेबसाइटवर दिलेल्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप ३: आता नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. स्टेप ४: तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. स्टेप ५: ते आता डाउनलोड करा. स्टेप ६: परीक्षा हॉलमध्ये नेण्यासाठी प्रवेशपत्राची प्रिंट घ्या. अशी असेल परीक्षा IIM अहमदाबाद (IIM, Ahmedabad) तर्फे २८ नोव्हेंबर रोजी परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. गेल्या वर्षी परीक्षेमध्ये एकूण ७६ प्रश्न विचारण्यात आले होते. यंदा कॅटमध्ये ६४ ते ६८ प्रश्न विचारले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रश्न तीन भागात विचारले जातील. शाब्दिक क्षमता आणि वाचन आकलन, वाचन, क्वांटिटेटिव्ह एबिलिटी, डेटा इंटरप्रिटेशन आणि लॉजिकल रिझनिंगमधून प्रश्न विचारले जातील. प्रत्येक विभाग सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना ४० मिनिटे दिली जातील. अपंग व्यक्तींना (PH उमेदवार) प्रश्न सोडवण्यासाठी १३ मिनिटे ३० सेकंदांचा अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. प्रत्येक विभागातून २० ते २४ प्रश्न विचारले जाणाार आहेत. यामध्ये मल्टिपल चॉइस आणि नॉन मल्टिपल चॉइस असे दोन्ही प्रश्न असतील. MCQ मध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. नॉन MCQ मध्ये निगेटिव्ह मार्किंग नसेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jH7SGa
via nmkadda