CBSE टर्म १ परीक्षांसाठी अॅडमिट कार्ड लवकरच Rojgar News

CBSE टर्म १ परीक्षांसाठी अॅडमिट कार्ड लवकरच Rojgar News

Term 1 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) द्वारे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ दरम्यान माध्यमिक आणि उच्च माध्यमिक इयत्तांच्या टर्म १ बोर्ड परीक्षांसाठी अॅडमिट कार्ड लवकरच जारी केले जाणार आहे. बोर्डाद्वारे सीबीएसई टर्म १ अॅडमिट कार्ड २०२१ अधिकृत वेबसाइट, वर जारी केले जातील. सीबीसएई बोर्ड एक्झाम अॅडमिट कार्ड जारी झाल्यानंतर विद्यार्थी सीबीएसई पोर्टल वर अॅक्टिव केल्या जाणाऱ्या लिंकद्वारे डाऊनलोड करू शकतील. विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटला वेळोवेळी भेट देत राहावी. बोर्डाद्वारे कोणत्याही अॅडमिट कार्डाची हार्ड कॉपी पाठवली जाणार नाही. नोव्हेंबरच्या मध्यावर परीक्षा सीबीएसईद्वारे यंदा दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा दोन टप्प्यात आयोजित केल्या जाणार आहेत. टर्म १ परीक्षांसाठी बोर्डाने अलीकडेच वेळापत्रक जारी केले आहे. सोबतच यंदा बोर्डाने विद्यार्थी संख्या अधिक असणाऱ्या विषयांना मेजर आणि विद्यार्थी संख्या अधिक असणाऱ्या विषयांना मायनर विषय असे विभाजन केले आहे. दोन्ही विषयांसाठी वेगवेगळे वेळापत्रक जारी केले आहे. सीबीएसई बोर्ड टर्म १ एक्झाम 2021 च्या मायनर विषयांच्या वेळापत्रकानुसार बारावीच्या परीक्षा १६ नोव्हेंबर आणि दहावीच्या परीक्षा १७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. मेजर विषयांसाठी सीबीएसई टर्म १ वेळापत्रकानुसार दहावीच्या परीक्षांचे आयोजन ३० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर २०२१ या कालावधीत करण्यात आले आहे तर बारावीच्या परीक्षा २२ डिसेंबर पर्यंत आयोजित केल्या जाणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZjkFYJ
via nmkadda

0 Response to "CBSE टर्म १ परीक्षांसाठी अॅडमिट कार्ड लवकरच Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel