Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २५, २०२१ WIB
Last Updated 2021-10-25T12:43:42Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CMA डिसेंबर २०२१: इंटरमिजिएट आणि अंतिम कोर्सच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट Rojgar News

Advertisement
CMA December 2021: इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICMAI) ने विद्यार्थ्यांना CMA इंटरमीडिएट आणि अंतिम अभ्यासक्रमांच्या डिसेंबर २०२१ च्या परीक्षेतून ऑप्ट आऊटचा पर्याय दिला आहे. अधिक वेबसाइट Icmai.in वर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. इंटर आणि फायनलच्या विद्यार्थ्यांना डिसेंबर २०२१ च्या सीएमए परीक्षेतून बाहेर पडण्याचा पर्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. या विनंतीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना ऑप्ट आऊटची संधी देण्यात आली आहे. दोन्ही अभ्यासक्रमांचे विद्यार्थी च्या परीक्षेत बसू इच्छित नसतील तर ते आयसीएमएआयच्या वेबसाइटवर दिलेल्या लिंकद्वारे ऑप्ट आऊटसाठी अर्ज करू शकतात. २७ ऑक्टोबर २०२१ ही यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. याआधी ICMAI ने जून २०२१ सत्रासाठी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या CMA इंटर आणि अभ्यासक्रमांच्या परीक्षा २१ ते २८ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलल्या होत्या. संस्थेने २५ सप्टेंबर रोजी यासंदर्भात नोटीस जाहीर केली आहे. इंटर आणि फायनल परीक्षा अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासोबतच ICMAI ने डिसेंबर २०२१ सत्राच्या परीक्षांसह CMA इंटर आणि फायनल जूनच्या परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. संस्थेने इच्छुक उमेदवारांना डिसेंबर २०२१ च्या परीक्षेतूनही बाहेर पडण्याचा पर्याय दिला आहे. दुसरीकडे इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंट्स ऑफ इंडिया (Institute of Cost Accountants of India, ICMAI) ने डिसेंबर २०२१ सत्रासाठी CMA आणि फायनल परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. CMA ची इंटर आणि अंतिम परीक्षा ८ ते १५ डिसेंबर २०२१ दरम्यान होणार आहे. परीक्षा ९६ भारतीय शहरे आणि तीन परदेशी केंद्रांमध्ये ऑनलाइन-केंद्रावर आधारित पद्धतीने आयोजित केल्या जाणार आहेत. दोन शिफ्टमध्ये परीक्षा पेपर १ आणि पेपर २ सकाळच्या शिफ्टमध्ये, तर पेपर ३ आणि ४ दुपारच्या शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहेत. सीएमए फाउंडेशन परीक्षेत अनेक पर्यायी प्रश्न विचारले जातील आणि विद्यार्थी त्यांच्या लॅपटॉप / कॉम्प्युटर / मोबाईल / टॅबलेटद्वारे घरून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देऊ शकतील. आयसीएमएआयच्या वेळापत्रक आणि परीक्षा योजनेनुसार, प्रत्येक पेपरमध्ये ५० प्रश्न असतील जे संबंधित विषयातून विचारले जातील. प्रत्येक प्रश्नासाठी २ गुण दिले जातात. याचा अर्थ असा की प्रत्येक शिफ्टमध्ये १०० प्रश्न असतील आणि यासाठी एकूण २०० गुण देण्यात आले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jxvyge
via nmkadda