CSSS 2021-22: हायर एज्युकेशन स्कॉलरशीपसाठी अर्ज सुरु, जाणून घ्या डिटेल्स Rojgar News

CSSS 2021-22: हायर एज्युकेशन स्कॉलरशीपसाठी अर्ज सुरु, जाणून घ्या डिटेल्स Rojgar News

2021-22: शिष्यवृत्तीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ (Central Sector Scheme of Scholarship, ) साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या उच्च शिक्षण शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालय आणि विद्यापीठाचे विद्यार्थी ऑनलाइन अर्ज करू शकतात. यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याऱ्या विद्यार्थ्यास राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल, Scholarships.gov.in ला भेट द्यावी लागेल. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये, विविध राज्यांच्या नवीन उमेदवारांसाठी अर्ज विंडो खुल्या करण्यात आल्या आहेत. नॅशनल स्कॉलरशीपच्या अधिकृत वेबसाइटवर उमेदवार राज्यांची यादी पाहू शकतात. या सूचीमध्ये उपलब्ध नसलेल्या राज्यांच्या उमेदवारांना अर्जाची प्रतीक्षा करावी लागेल. कोण करू शकतो अर्ज ? या स्कॉलरशीप प्रोग्रामसाठी जाहिर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार बारावीमध्ये ८० टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासक्रमात असणे आवश्यक आहे. पत्रव्यवहार किंवा दूरस्थ शिक्षण पद्धतीचे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र नाहीत. याव्यतिरिक्त, विद्यार्थ्याचे कौटुंबिक उत्पन्न वार्षिक ८ लाख रुपयांपेक्षा कमी असावे. इतर कोणतीही शिष्यवृत्ती मिळविणारे आणि कोणत्याही प्रकारचे शुल्क प्रतिपूर्ती प्राप्त करणारे या योजनेसाठी पात्र नाहीत. त्याचबरोबर, डिप्लोमा अभ्यासक्रमाचे विद्यार्थीही योजनेअंतर्गत पात्र नसतील असेही सांगण्यात आले आहे. अर्जाशी संबंधित माहिती सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ स्कॉलरशीप (Central Sector Scheme of Scholarship)संदर्भात सर्व उमेदवारांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार संस्थांनी आपल्याकडे आलेल्या ऑनलाइन अर्जांची पडताळणी करायची आहे. अन्यथा अर्ज अवैध मानला जाईल. आवश्यक असल्यास, संस्थेला मूळ कागदपत्रे दाखवा. अर्जाशी संबंधित तपशीलवार माहिती अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी ते नीट तपासावे. CSSS स्कॉलरशीपबद्दल... CSSS स्कॉलरशीप ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय किंवा विद्यापीठात जाते. यासाठी, बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालय किंवा विद्यापीठात उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी १० ते २० हजार रुपयांची स्कॉलरशीप दिली जाते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nbmcb9
via nmkadda

0 Response to "CSSS 2021-22: हायर एज्युकेशन स्कॉलरशीपसाठी अर्ज सुरु, जाणून घ्या डिटेल्स Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel