Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर १८, २०२१ WIB
Last Updated 2021-10-18T10:43:49Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CTET 2021 अर्जातील चुका दुरुस्त करण्याची संधी, जाणून घ्या डिटेल्स Rojgar News

Advertisement
December 2021 application correction: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) डिसेंबरमध्ये घेतली जाणार आहे. जर तुम्ही साठी अर्ज केला असेल तर सर्व भरलेली माहिती नीट तपासा. कारण उमेदवारांना CTET अर्जामध्ये सुधारणा करण्याची संधी दिली जात आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर या संदर्भात माहिती दिली आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. त्यावर क्लिक करून थेट CTET च्या वेबसाइटवर जाऊ शकता आणि सूचना देखील वाचू शकता. CTET अर्ज २०२१ मध्ये सुधारणा करण्यासाठी अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर ऑनलाइन विंडो खुली केली जाईल. ही लिंक २२ ऑक्टोबर २०२१ रोजी अॅक्टीव्ह केली जाणार आहे. २८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत उमेदवारांना त्यांच्या अर्जात सुधारणा करण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांना दुसरी संधी दिली जाणार नाही, असे सीबीएसईने स्पष्ट केले आहे. यामध्ये करता येईल सुधारणा उमेदवाराचे नाव पालकांचे नाव जन्मतारीख श्रेणी पेपर ऑप्शन (जी परीक्षा द्यायची आहे) पेपर २ चा विषय परीक्षा केंद्राची पहिली पसंती परीक्षेच्या भाषा पत्ता बीएड (BEd) किंवा डीएलएड (DElEd) केले त्या संस्थेचे नाव उमेदवारांना CTET अर्ज दुरुस्तीची प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करावी लागेल. फॅक्स, ई-मेल किंवा इतर कोणत्याही ऑफलाइन माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाही. २० सप्टेंबर २०२१ ते १९ ऑक्टोबर २०२१ ही CTET 2021 साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. अद्याप कोणत्याही उमेदवाराने अर्ज केला नसल्यास त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DQs0gN
via nmkadda