CTET 2021: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट Rojgar News

CTET 2021: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट Rojgar News

CTET 2021 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) द्वारे आयोजित केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (CTET) डिसेंबर २०२१ साठी नोंदणी करणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती आहे. परीक्षेची तयारी करणाऱ्या ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अद्याप नोंदणी केली नसेल त्यांना लवकरच नोंदणी करावी लागेल. CTET 2021 च्या नोंदणीसाठी अर्जाची विंडो २५ ऑक्टोबर २०२१ रोजी बोर्डाद्वारे बंद केली जाणार आहे. तथापि, ज्या उमेदवारांनी आजपर्यंत नोंदणी केली आहे त्यांना २६ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत परीक्षेसाठी विहित शुल्क भरण्याची वेळ असेल. १८ ऑक्टोबर २०२१ ही CTET २०२१ परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. जी बोर्डाने एका आठवड्याने वाढविण्यात आली. त्यानुसार उमेदवार आता २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. CTET २०२१ नोंदणीची प्रक्रिया २० सप्टेंबर २०२१ पासून सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी नोंदणी करणारे उमेदवार २६ ऑक्टोबर २०२१ च्या दुपारी ३.३० पर्यंत अर्ज शुल्क भरू शकतील. यापूर्वी CBSE तर्फे सीईटी २०२१ नोंदणी विंडो १९ ऑक्टोबर २०२१ रोजी बंद करण्यात येणार होती. तसेच अर्ज केलेल्या उमेदवारांना अर्ज शुल्क २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत भरता येणार होते. यानंतर अर्ज शुल्काची पडताळणी २१ ऑक्टोबरपर्यंत करावी लागणार होती. ३ नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज सीबीएसईने जाहीर केलेल्या ताज्या सीटीईटी २०२१ च्या वेळापत्रकानुसार, उमेदवार आता २८ ऑक्टोबर २०२१ पासून त्यांच्या ऑनलाइन अर्जात सुधारणा करू शकतील. ३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत CTET २०२१ अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी विंडो खुली ठेवण्याची घोषणा मंडळाने केली आहे. यापूर्वी अर्ज दुरुस्तीची विंडो २२ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत खुली राहणार होती. एका पेपरसाठी १ हजार आणि दोन्हीसाठी १२०० रुपये शुल्क सीबीएसईद्वारे सीटीईटी परीक्षमध्ये दोन पेपर घेतले जातात. पहिली ते पाचवीच्या इयत्तांचे शिक्षक होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना पेपर १ मध्ये, तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी उमेदवारांना पेपर २ मध्ये उपस्थित राहावे लागेल. सीबीएसई CTET २०२१ च्या नोटीसनुसार, एका पेपरसाठी (पहिली किंवा दुसरी) परीक्षा फी १००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर दोन्ही पेपरसाठी एकूण १२०० रुपये भरावे लागतील. एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी दोन्ही पेपरची फी फक्त ६०० रुपये आहे. CTET परीक्षा १६ डिसेंबर ते १३ जानेवारी दरम्यान होणार आहे.सीबीएसईने जाहीर केलेल्या सीटीईटी २०२१ माहिती बुलेटिन आणि १७ सप्टेंबर २०२१ च्या नोटिसनुसार, सीटीईटी डिसेंबर २०२१ परीक्षा १६ डिसेंबर ते १३ जानेवारी २०२२ दरम्यान वेगवेगळ्या तारखांना घेण्यात येणार आहे. बोर्डाद्वारे उमेदवारांना दिलेल्या CET २०२१ प्रवेशपत्रावर परीक्षेची तारीख आणि वेळेबद्दल माहिती मिळेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3b8oUII
via nmkadda

0 Response to "CTET 2021: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel