Government job: 'या' ५ मोठ्या सरकारी कंपनीत ९२९६ पदे रिक्त; अर्ज करण्याची शेवटची संधी Rojgar News

Government job: 'या' ५ मोठ्या सरकारी कंपनीत ९२९६ पदे रिक्त; अर्ज करण्याची शेवटची संधी Rojgar News

Government job: सरकारी नोकरी मिळवायची इच्छा असलेल्या आणि केंद्र, राज्य सरकारच्या विविध भरतीसाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्र आणि राज्य सरकाराअंतर्गत येणाऱ्या ५ मोठ्या सरकारी कंपन्यांमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया २५ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. या भरतींमध्ये, कर्मचारी निवड आयोग (SSC) केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमध्ये ३२२०, भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये २०५६ प्रोबेशनरी ऑफिसर, भारतीय नौदलामध्ये नाविक (AA आणि SSR) च्या २५०० जागा, आसाम रायफल्समध्ये भरतीचा समावेश आहे. तसेच १२३० टेक्निकल आणि ट्रेड्समन पदांची भरती तसेच महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा २०२१ द्वारे २९० पदांच्या भरतीचा समावेश आहे. या सर्व भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. आज संपत असलेल्या या ५ मोठ्या सरकारी नोकऱ्यांसाठीच्या अर्ज प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया- एसएससी निवड पोस्ट फेज ९ : ३२२० पदांसाठी अर्ज करा देशभरात केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या विविध मंत्रालयांमध्ये आणि त्यांच्या संलग्न विभागांच्या कार्यालयांमध्ये ३२६१ पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही प्रक्रिया कर्मचारी निवड आयोग (SSC) द्वारे निवड पोस्ट (फेज ९) २०२१ द्वारे आयोजित केली जाणार आहे. या पदांसाठी दहावी पास ते पदवीधर आणि उच्च पात्रता असलेले अर्ज करण्यास पात्र आहेत. या पदांवर अर्ज करण्यासाठी, उमेदवार नोंदणी करू शकतात आणि नंतर आयोगाच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचणे गरजेचे आहे. SBI PO 2021: २०५६ पदांची भरती स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या २०५६ पदांसाठी भरती जाहिरात ४ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रसिद्ध झाली. त्याचबरोबर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. २५ ऑक्टोबर हा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी, उमेदवार SBI PO 2021 नोटिफिकेशन वाचू शकतात. तसेच अधिकृत वेबसाइट sbi.co.in च्या भरती विभागात जाऊन अर्ज करु शकतात. नेव्ही सेलर (AA आणि SSR) - फेब्रुवारी २०२२ बॅच - २५०० पदांची भरती भारतीय नौसेनेद्वारे सिनिअर सेंकेडरी रिक्रूट(SSR) आणि मॅट्रिक भर्ती (MR) अंतर्गत नाविकांच्या एकूण २५०० पदांच्या भरतीसाठी १६ ऑक्टोबर २०२१ पासून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. अर्ज करण्यासाठी, उमेदवार भारतीय नौदलाची अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नेव्ही सेलर (AA & SSR) भरती २०२१ नोटिफिकेशन पाहणे आवश्यक आहे. आसाम रायफल्स १२३० टेक्निकल आणि ट्रेड्समन भरती आसाम रायफल्समध्ये टेक्निकल आणि ट्रेड्समनच्या एकूण १२३० पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. उमेदवार अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट assamrifles.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात. किंवा नोटिफिकेशन डाऊनलोड करु शकतात. MPSC राज्य सेवा प्राथमिक परीक्षा २०२१ – २९० पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा परीक्षा २०२१ द्वारे २९० पदांची भरती केली जात आहे. या पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in ला भेट देऊन नोटिफिकेशन डाऊनलोड करु शकतात. यामध्ये पदभरतीचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EdBumI
via nmkadda

0 Response to "Government job: 'या' ५ मोठ्या सरकारी कंपनीत ९२९६ पदे रिक्त; अर्ज करण्याची शेवटची संधी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel