Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २५, २०२१ WIB
Last Updated 2021-10-25T07:43:46Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IBPS PO Exam 2021: 'असे' असेल प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या परीक्षेचे स्वरुप, गुणांकन Rojgar News

Advertisement
संजय मोरे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने () ११ सहयोगी बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती केली जाते. ऑनलाइन प्रीलिमिनरी परीक्षा ४ डिसेंबर आणि १२ डिसेंबर, २०२१ रोजी होईल. ऑनलाइन मुख्य परीक्षा जानेवारी २०२२मध्ये घेतली जाईल. ११ सहयोगी बँकांमधून आठ बँकांमधील एकूण ४,१३५ रिक्त आहेत (अजा-६७९, अज-३५०, इमाव-११०२, इडब्ल्यूएस-४०४, खुला-१६००). दिव्यांग उमेदवारांसाठी एकूण २१० पदं राखीव आहेत (एचआय-५८, ओसी-३७, व्हीआय-४८, आयडी-६७). ० पात्रता- १० नोव्हेंबर, २०२१ रोजी पदवी उत्तीर्ण ० वयोमर्यादा- १ ऑक्टोबर, २०२१ रोजी २० ते ३० वर्षं (इमाव-३३ वर्षांपर्यंत, अजा/अज- ३५ वर्षांपर्यंत, दिव्यांग-४० वर्षांपर्यंत). ० निवड पद्धती- कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस- ऑनलाइन परीक्षा- (अ) प्रीलिमिनरी परीक्षा- १०० प्रश्न, १०० गुण, वेळ ६० मिनिटं (इंग्रजी भाषा- ३० प्रश्न, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड- ३५ प्रश्न, रिझनिंग अॅबिलिटी- ३५ प्रश्न, वेळ प्रत्येकी २० मिनिटं) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची. (ब) मुख्य परीक्षा- १. रिझनिंग अँड कम्प्युटर अॅप्टिट्यूड- ४५ प्रश्न, ६० गुण, वेळ ६० मिनिटं; २. जनरल/ इकॉनॉमी/ बँकिंग अवेअरनेस- ४० प्रश्न, ४० गुण, वेळ ३५ मिनिटं; ३. इंग्रजी भाषा- ३५ प्रश्न, ४० गुण, वेळ ४० मिनिटं; ४. डेटा अॅनालिसीस अँड इंटरप्रिटेशन- ३५ प्रश्न, ६० गुण, वेळ ४५ मिनिटं; ५. इंग्रजी भाषेत पत्र लेखन आणि निबंध- २ प्रश्न, प्रत्येकी २५ गुण, वेळ ३० मिनिटं. ऑब्जेक्टिव्ह टाइप परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या ०.२५ गुण वजा केले जातील. (क) मुलाखत- ऑनलाइन मुख्य परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांची १०० गुणांसाठी मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लेखी परीक्षेतील गुण प्रसिद्ध केले जातील. ० ऑनलाइन अर्ज www.ibps.in या संकेतस्थळावर १० नोव्हेंबर, २०२१पर्यंत करावेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EaGPem
via nmkadda