GMC Recruitment: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड Rojgar News

GMC Recruitment: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड Rojgar News

GMC Nagpur Recruitment 2021: नागपुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ()विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी थेट मुलाखतीतून निवड होणार आहे. या पदभरतीअंतर्गत पदाच्या (Assistant Professor) ६४ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहणे आवश्यक आहे. या पदभरतीसंदर्भात नागपुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या भरतीअंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे एमडी किंवा डिएमची पदवी असणे गरजेचे आहे. तसेच संबंधित कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. अधिकृत वेबसाइट https://ift.tt/3vuaE6u वर पदभरतीचा तपशील देण्यात आला आहे. उमेदवारांनी मुलाखतीला येण्यापुर्वी नोटिफिकेशनमधील पात्रता, निकष काळजीपुर्वक वाचणे गरजेचे आहे. तसेच पदासाठी आवश्यक संबंधित कागदपत्रे सोबत आणावी. उमेदवारांची थेट मुलाखत अधिष्ठाता कार्यालय, , नागपूर या पत्त्यावर २२ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता होणार आहे. सरकारी बॅंकेत ४१३५ पदांची भरती राष्ट्रीय बँकांमध्ये सरकारी नोकरी शोधणाऱ्या आणि IBPS PO परीक्षा २०२१ ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) ने विविध राष्ट्रीय सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये एकूण ४१३५ पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. सरकारी बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनीच्या ४ हजारहून अधिक पदांवर भरती सुरु आहे. यासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवाराक कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे गरजेचे आहे. पदांसाठी इच्छुक उमेदवार IBPS ची अधिकृत वेबसाइट ibps.in वर ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकतील. अर्ज प्रक्रियेअंतर्ग उमेदवार २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत नोंदणी करू शकतील. तसेच, त्याच तारखेपर्यंत, उमेदवारांना विहित अर्ज शुल्क देखील भरावे लागेल. अर्ज शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरावे लागणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3G7kBvC
via nmkadda

0 Response to "GMC Recruitment: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel