Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २१, २०२१ WIB
Last Updated 2021-10-21T07:43:33Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

'या' कॉलेजमध्ये उपस्थित राहिला अवघा एक विद्यार्थी! Rojgar News

Advertisement
म. टा. वृत्तसेवा, मनमाड करोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश या शासनाच्या नियमामुळे मनमाड महाविद्यालयात केवळ एका विद्यार्थ्यालाच प्रवेश मिळाला. साडेतीन हजार विद्यार्थीसंख्या असलेल्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात अवघा एक विद्यार्थी वर्गात बसल्याचे व त्याच्याशी प्राध्यापकांनी संवाद साधून अध्यापन केल्याचे चित्र बुधवारी पहायला मिळाले. उत्साहाने कॉलेजमध्ये आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना नियमामुळे आल्या पावली घरी परतावे लागले. महाविद्यालय सुरू होणार म्हणून वर्ग स्वच्छता, सॅनिटायझर फवारणी, सुरक्षित अंतराची व्यवस्था या सर्व गोष्टींचे नियोजन महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित मनमाड महाविद्यालयात करण्यात आले होते. मात्र एवढी तयारी करूनही महाविद्यालय प्रशासनाची निराशा झाली. लशीचे दोन्ही डोस विद्यार्थ्याने घेणे आवश्यक हा मुद्दा कळीचा ठरला. आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांनीच पहिला डोस घेतलेला होता. विशेष म्हणजे दोन्ही डोस घेणारा एकच विद्यार्थी आढळला. त्यालाच महाविद्यालयात प्रवेश देत अध्यापन करण्यात आले. ही बाब शहरात चर्चेचा विषय ठरली. महाविद्यालयात आज लसीकरण अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी लसीकरणापासून वंचित असल्याने त्याचा परिणाम अध्यापनावर होत आहे. यामुळे महात्मा गांधी विद्यामंदिर शिक्षण संस्था व मनमाड नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज, गुरुवारी मनमाड महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन नगराध्यक्षा पद्मावती धात्रक, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष जगताप यांनी केले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे महाविद्यालयात साडेतीन हजार विद्यार्थी असूनही केवळ एकाच विद्यार्थ्याला आम्हाला प्रवेश देता आला. आम्ही नियमांचे बांधिल आहोत. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रवेश देता आला नाही. सर्व विद्यार्थ्यांनी लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, दोन्ही डोस घ्यावेत. - अरुण पाटील, प्राचार्य, मनमाड महाविद्यालय


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vu8rI8
via nmkadda