Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २१, २०२१ WIB
Last Updated 2021-10-21T06:43:34Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

MPSC Recruitment: राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ Rojgar News

Advertisement
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (MPSC) राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ च्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. MPSC तर्फे यासंदर्भात प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले आहे. जाहिरात क्रमांक १०६/२०२१ राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ करीता अर्ज सादर करण्यास दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य सेवा परीक्षा २०२१ अंतर्गत २९० रिक्त जागांवर पद भरतीची प्रक्रिया सुरु आहे. या पदांसाठी २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता याला मुदतवाढ देण्यात आली आहे. एमपीएससीने सोमवारी राज्यसेवा परीक्षा २०२१ ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक, सहायक राज्य कर आयुक्त, गटविकास अधिकारी आणि तत्सम पदे, वित्त व लेखा सेवा सहायक संचालक, उद्योग उपसंचालक, सहायक कामगार आयुक्त, उपशिक्षणाधिकारी आणि तत्सम पदे, कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी अशी २९० पदे भरण्यात येणार आहे. एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या संवर्गातील पदसंख्या आणि आरक्षणामध्ये सरकारच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. जाहिरातीमध्ये नमूद संवर्गांपैकी काही मागास प्रवर्ग आणि समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध नाहीत. मात्र, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आणि पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रामध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या मागास प्रवर्ग, समांतर आरक्षणासाठी पदे उपलब्ध होण्याची, विद्यमान पदसंख्येमध्ये बदल किंवा वाढ होण्याची शक्यता आहे. खुल्या प्रवर्गासाठी ५४४ रुपये, तर राखीव प्रवर्गासाठी ३४४ रुपये शुल्क आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://ift.tt/3oZLYzp या वेबसाइटवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 'ती' मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अंतरिम आदेशाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीतर्फे ३० ऑक्टोबरला होणारी सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा २०२० पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांना आता आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुख्य परीक्षेची सुधारित तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती एमपीएससीकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ncZaAL
via nmkadda