Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २६, २०२१ WIB
Last Updated 2021-10-26T12:43:09Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IBPS PO भरती परीक्षेत केवळ ८ बँका सहभागी, जागाही झाल्या कमी Rojgar News

Advertisement
IBPS : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकऱ्या शोधणाऱ्या तरुणांसाठी आयबीपीएसने पदभरतीच्या माध्यमातून एक उत्तम संधी आणली आहे. आयबीपीएस म्हणजेच इंस्टिट्यूट ऑफ पर्सोनेल बँकिंगने पीओच्या ४१३५ पदभरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २० ऑक्टोबरपासून सुरू असून ती १० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या भरतीचे नोटिफिकेशन IBPS वेबसाइट https://ibps.in/ वर पाहता येणार आहे. या वेबसाइटवर जाऊन उमेदवारांनाऑनलाइन अर्जही करता येणार आहे. आयबीपीएस पीओ भरती २०२१ साठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे वय किमान २० वर्षे आणि कमाल ३० वर्षे असणे गरजेचे आहे. १ ऑक्टोबर २०२१ पासून वयाची गणना केली जाईल. आयबीपीएसतर्फे एकूण ११ बँकांमध्ये भरती केली जाते. मात्र यावेळी केवळ ८ बँकांमध्ये पीओ पदावर नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. २०२१ मध्ये केवळ आठ बँका सहभागी आहेत. तपशीलानुसार बँक ऑफ इंडियामध्ये ५८८, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ४००, पंजाब आणि सिंध बँकेत ४२७, युको बँकेत ४४०, कॅनरा बँकेत ६५०, इंडियन ओव्हरसीज बँकेत ९८ आणि युनियन बँकेत ९१२ रिक्त पदे भरायची आहेत. यावेळी रिक्त जागा कमी आयबीपीएस पीओ आणि एमटीच्या एकूण ४१३५ पदांची भरती केली जाणार आहे. या संख्येची मागील भरतीशी तुलना केली जात आहे. प्रत्यक्षात मागील भरतीतील अंतिम निकालानंतर एकूण ४७९९ पदांची भरती करण्यात आली होती. त्यानुसार या भरतीमध्ये मागील भरतीपेक्षा एकूण ६५० पदे कमी आहेत. RRB मुलाखतीसाठी प्रवेशपत्र जाहीर आयबीपीएस आरआरबी ऑफिसर स्केल I, II आणि III च्या मुलाखतीसाठी प्रवेशप्रत्र जाहीर करण्यात आले आहे. IBPS ने अधिकृत वेबसाइट ibps.in वर मुलाखतीसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहेत. या मुलाखतीला हजर राहणारे उमेदवार नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख भरुन त्यांचे प्रवेशपत्र (IBPS RRB Officer Interview Admit Card) डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्रामध्ये दिल्याप्रमाणे उमेदवारांना मुलाखतीवेळी सोबत न्याव्या लागणाऱ्या कागदपत्रांची यादी सोबत न्यावी लागणार आहे. उमेदवारांना पूर्व आणि मुख्य परीक्षेतील निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. मुख्य परीक्षा २५ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. अधिकृत नोटीसमध्ये दिलेल्या माहितीनुसार ८ नोव्हेंबर २०२१ पासुन मुलाखत सुरु होण्याची शक्यता आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nMtgLN
via nmkadda