IBPS RRB PO मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर Rojgar News

IBPS RRB PO मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर Rojgar News

IBPS PO 2021: RRB मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल (Institute of Banking Personnel, IBPS) ने आरआरबी स्केल १ (CRP-RRBs-X) ग्रुप ए ऑफिसर स्केल १ (Officers Scale-I)चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या परीक्षेला बसलेले उमेदवार आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर निकाल पाहू शकतात. यासाठी उमेदवारांना आपला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड सबमिट करावा लागणार आहे. बातमीखाली रिझल्टची थेट लिंक देण्यात आली आहे. IBPS RRB PO Mains Result 2021: असा पाहा रिझल्ट स्टेप १: IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. स्टेप २: होमपेजवर 'IBPS RRB Officer Scale - I Result' या लिंकवर क्लिक करा. स्टेप ३: नवीन पेज उघडा. येथे तुमचा नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि जन्मतारीख किंवा पासवर्ड टाका. स्टेप ४: कॅप्चा कोड टाइप करा. स्टेप ५: IBPS RRB PO मुख्य परीक्षा निकाल २०२१ स्क्रीनवर उघडेल. स्टेप ६ : रिझल्ट तपासल्यानंतर डाउनलोड करा आणि पुढील उपयोगासाठी प्रिंट घ्या. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेलने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, उमेदवारांना आपला रिझल्ट वेळेत डाऊनलोड करावा लागणार आहे. २० ऑक्टोबर २०२१ नंतर ही लिंक निष्क्रीय केली जाणार आहे. IBPS RRB PO मुख्य भरती परीक्षा २५ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. या भरतीद्वारे एकूण ५ हजार पदांची भरती केली जाणार आहे. ही परीक्षा २ तासांच्या कालावधीसाठी घेण्यात आली. परीक्षेत २०० गुणांसाठी २०० एमसीक्यू प्रश्न विचारण्यात आले. या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. IBPS RRB PO भरती २०२१ आरआरबी पीओ (IBPS RRB PO) ही तीन टप्प्यातील भरती प्रक्रिया आहे. पात्र उमेदवारांना भारताच्या प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये प्रोबेशनरी अधिकारी (PO) म्हणून भरती केले जाईल. भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर IBPS RRB कट-ऑफ पूर्ण करणे अनिवार्य आहे. आयबीपीएस प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये (RRB) गट 'ए' -ऑफिसर्स (स्केल- I, II आणि III) च्या पदांसाठी भरती होत आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vey8fY
via nmkadda

0 Response to "IBPS RRB PO मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel