ICSE कडून दहावी, बारावी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर Rojgar News

ICSE कडून दहावी, बारावी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर Rojgar News

ICSE, Date Sheet 2022: काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने(Council for the Indian School Certificate Examinations, CISCE)ICSE म्हणजेच दहावी आणि ISC म्हणजे बारावीच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. नोटिफिकेशननुसार ICSE, ISC च्या सेमिस्टर १ परीक्षांचे सुधारित वेळापत्रक अधिकृत वेबसाइट https://www.cisce.org/ वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या दोन्ही वर्गांच्या परीक्षा वेगवेगळ्या तारखांना सुरू होणार आहेत. दहावीची परीक्षा २९ नोव्हेंबरपासून आणि बारावीची परीक्षा २२ नोव्हेंबरपासून सुरू होईल. दहावीच्या परीक्षा १५ डिसेंबर २०२१ आणि बारावीची परीक्षा २० डिसेंबर रोजी संपेल. सविस्तर वेळापत्रकानुसार, इयत्ता बारावीचा इंग्रजी पेपर II चे आयोजन २२ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. यानुसार, इंग्रजी भाषा पेपर I परीक्षा २३, भौतिकशास्त्र पेपर थ्योअरी २५, गणित २९ नोव्हेंबर रोजी घेण्यात येईल. त्याचबरोबर इयत्ता दहावीमध्ये इंग्रजी भाषा पहिला पेपर २९ नोव्हेंबर, इंग्रजी दुसरा पेपर ३० नोव्हेंबर, इतिहास २ डिसेंबर आणि हिंदी ३ डिसेंबर रोजी आयोजित केला जाईल. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, दहावी आणि बारावीच्या परीक्षा १ तास ते १.५ तासांच्या कालावधीच्या असतील. या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेनुसार त्यांच्या शाळांमध्ये रिपोर्ट करावा लागेल. परीक्षांचे आयोजन विद्यार्थ्यांच्या संबंधित शाळांमध्ये करण्यात आले आहे. तसेच परीक्षा आयोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवरील अपडेटकडे लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. यापुर्वी आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीची पहिली टर्म परीक्षा १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार होती. पण काऊन्सिलतर्फे ही परीक्षा स्थगित करण्यात आली. सीबीएसईच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आयसीएसईने दोन अटींवर दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. सीबीएसईप्रमाणे येथे यात टर्म १ आणि टर्म २ परीक्षा आहेत. तसेच या प्रणाली अंतर्गत, बोर्डाच्या टर्म १ च्या परीक्षा नोव्हेंबरमध्ये होणार होत्या. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आयसीएसईतर्फे दहावी आणि बारावी टर्म १ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. या परीक्षा १५ नोव्हेंबर २०२१ पासून होणार होत्या. मागील वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा १६ डिसेंबर २०२१ रोजी संपणार होती. याशिवाय दहावीच्या परीक्षा ६ डिसेंबर २०२१ रोजी संपणार होती. आयसीएसईने करोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यानंतर विशिष्ट सूत्रानुसार, मूल्यांकन करत विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला होता. २४ जुलै रोजी आयसीएसई बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाला. यावर्षी ICSE म्हणजेच दहावीचा निकाल ९९.९८ टक्के होता. ISC म्हणजेच बारावीच्या निकालाची उत्तीर्णता ९९.७६ टक्के होती. दरम्यान आता नव्या अपडेटनुसार टर्म १ च्या परीक्षा पुढील सूचना येईपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ninCRi
via nmkadda

0 Response to "ICSE कडून दहावी, बारावी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel