Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २३, २०२१ WIB
Last Updated 2021-10-23T06:43:50Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

एमबीए एमएमएस सीईटी निकाल रखडला; सोमवारी सुनावणी Rojgar News

Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई एमबीए प्रवेशासाठी पार पडलेल्या एमबीए प्रवेश परीक्षेचा निकाल (MHT MBA MMS CET 2021 Result) अद्याप न लागल्याने विद्यार्थी तणावाखाली आहेत. ही परीक्षा दिलेल्या ३८ विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेतील त्रुटींबाबत उच्च न्यायालयात दाद मागितल्यामुळे हा निकाल अद्याप लागलेला नाही. यावर येत्या सोमवारी सुनावणी होणार असून, त्यानंतर निकालाविषयी स्पष्टता येणार आहे. मास्टर इन मॅनेजमेंट स्टडीज (MMS) प्रवेशासाठी राज्य प्रवेश परीक्षा कक्षाने सप्टेंबरमध्ये प्रवेश परीक्षा घेतली होती. सुमारे एक लाख १० हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. निकाल जाहीर न झाल्याने राज्यात ३५ हजार जागांवरील प्रवेश रखडले आहेत. येत्या सोमवारी या संदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यानंतर प्रवेश प्रक्रियेचे भवितव्य ठरणार आहे. एमबीए आणि एमएमएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलच्या वतीने प्रवेश प्रक्रिया घेतली जाते. या परीक्षेला राज्यभरातून १ लाख ३२ हजार १९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. १६ ते १८ सप्टेंबर काळात या विद्यार्थ्यांची सीईटी घेण्यात आली होती. सुमारे २०० केंद्रांवर दररोज दोन सत्रांत ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. १ लाख १० हजार १९० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. परीक्षा दिल्यानंतर प्रवेश परीक्षेत त्रुटी होत्या. त्यामुळे यासंदर्भात ३८ विद्यार्थी या परीक्षेच्या विरोधात न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे निकाल जाहीर करण्यास स्थगिती देण्यात आली आणि पुढील सुनावणी १ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली. मात्र तोपर्यंत खूपच उशीर होईल म्हणून प्रवेश परीक्षा कक्षाने येत्या सोमवारी सुनावणी घेण्याबाबत न्यायालयास विनंती केली. या सुनावणीनंतर एमबीए प्रवेश परीक्षेचा निकाल आणि त्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे समजते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GgXhLM
via nmkadda