JoSAA Counseling 2021: JoSAA काऊन्सेलिंगची प्रक्रियेला सुरुवात Rojgar News

JoSAA Counseling 2021: JoSAA काऊन्सेलिंगची प्रक्रियेला सुरुवात Rojgar News

2021: जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शनिवार १६ ऑक्टोबर २०२१ पासून JoSAA काऊन्सेलिंगची प्रक्रिया सुरू झाली आहे. देशभरातील IITs, NITs, IIEST, IIITs संस्थांमधील इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी विद्यार्थी या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना या अधिकृत वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आहे. विद्यार्थ्यांनी ध्याने द्यावे की पहिल्या सीट अलॉटमेंट फेरीचा निकाल २२ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येईल. ही काऊन्सेलिंग प्रक्रिया सहा फेऱ्यांमध्ये आयोजित केली जाईल. अखेरचा राऊंड १८ नोव्हेंबर रोजी होईल. काऊन्सेलिंग प्रक्रिया अनेक टप्प्यांत होणार आहे. पसंतीक्रम भरणे, सीट अलॉटमेंटनंतर ऑनलाइन रजिस्ट्रेशन होईल. सीटची स्वीकृति किंवा सीट परत करणे, ऑनलाइन शुल्क भरणे, कागदपत्रांची पडताळणी आणि आवश्यक असल्यास उमेदवांरांकडून प्रश्नोत्तरे आदी विविध टप्प्यांद्वारे हे काऊन्सेलिंग होईल. उमेदवार या वृत्तात दिलेल्या स्टेप्सद्वारे देखील नोंदणी प्रक्रिया करू शकतात. JoSAA counselling 2021 registration: रजिस्ट्रेशन पुढील पद्धतीने करा - सर्वात आधी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट - josaa.nic.in वर जावे. यानंतर JoSAA नोंदणी पूर्ण करण्यासाठी थेट लिंकवर क्लिक करा. आवश्यक ती माहिती भरा. यानंतर JoSAA 2021 चॉइस फिलिंग पूर्ण करा. आता नोंदणी अर्जातील सर्व पर्यायांचा नीट आढावा घेऊन ते लॉक करा. यानंतर प्रिंट आऊट घेऊन भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवा. पुढील ११४ संस्थांमध्ये होऊ शकतात प्रवेश आयआयटी- २३, एनआयटी- ३१, आयआयआयटी- २६, अन्य-सरकारी वित्त तसेच तंत्र संस्था (अन्य-जीएफटीआय) २९, IIEST शिवपूर - १ JOSAA दूसरी सीट अलॉटमेंट लिस्ट १ रोजी आणि तिसरी यादी ६ नोव्हेंबर रोजी जारी केली जाईल. अंतिम सहावी अलॉटमेंट लिस्ट १८ नोव्हेंबर पर्यंत जारी केली जाणार आहे. या शेड्युलशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेब पोर्टल josaa.nic.in ला भेट देऊ शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BOXeEC
via nmkadda

0 Response to "JoSAA Counseling 2021: JoSAA काऊन्सेलिंगची प्रक्रियेला सुरुवात Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel