MHT CET Result 2021: सीईटी निकाल जाहीर; २८ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल Rojgar News

MHT CET Result 2021: सीईटी निकाल जाहीर; २८ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल Rojgar News

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल () बुधवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये २८ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत. आता प्रवेश प्रक्रिया एक नोव्हेंबरनंतर सुरू करण्याचा प्रवेश परीक्षा कक्षाचा विचार आहे. इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र, कृषी या अभ्यासक्रमांसाठी राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे प्रवेश परीक्षा घेण्यात येते. ही प्रवेश परीक्षा यंदा ३६ जिल्ह्यांच्या ठिकाणी २२७ परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने १३ दिवसांत २६ सत्रांमध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) हे विषय घेऊन सुमारे १ लाख ९२ हजार ३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (PCB) हा गट घेऊन दोन लाख २२ हजार ९३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी पीसीएम गटातील ११ विद्यार्थ्यांनी, तर पीसीबी गटातील १७ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाइल गुण मिळवले आहेत. यामध्ये पीसीएम गटात मुंबईतील विंच्ची दिशी, हर्ष शहा, अर्श मकनोजिया, नीरजा पाटील, राकेश कृष्णा या विद्यार्थ्यांचा समावेश आहे, तर ठाण्यातील जनम खंडेलवाल या विद्यार्थ्याचा समावेश आहे. यापैकी नीरजा पाटील या विद्यार्थिनीने जेईई अॅडव्हान्स परीक्षेतही चांगले गुण मिळवून देशात २६६वे स्थान मिळवले होते. औषधनिर्माणशास्त्र शाखेत प्रवेश घेण्यासाठी 'पीसीबी' गटातील परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील राजवील लखानी, कल्याणी कुडाळकर, कृष्णप्रिया नम्बोथिरी, तर ठाण्यातील मयुरा निकिता, गायत्री नायर या विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाइल गुण मिळवले आहेत. हा निकाल जाहीर झाल्यानंतर आता पुढील प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यासाठी वेळापत्रक जाहीर करणार असल्याचे कक्षाचे आयुक्त रविंद्र जगताप यांनी सांगितले. पुण्याच्या चौघांचे यश पुणे : सीईटीच्या निकालात पुणे जिल्ह्यात चार विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण मिळाले आहे. आदित्य मेहता, प्राजक्ता कदम, शुभम बेनके आणि ज्ञानेश्वरी राउत यांनी १०० पर्सेंटाइल गुण प्राप्त केले आहे. आदित्यने पीसीएम गटात १०० पर्सेंटाइल गुण मिळवले आहे, तर प्राजक्ता, शुभम आणि ज्ञानेश्वरीने पीसीबी गटात १०० पर्सेंटाइल गुण मिळवले आहे.या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CmIHQB
via nmkadda

0 Response to "MHT CET Result 2021: सीईटी निकाल जाहीर; २८ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel