NEET MDS परीक्षा २०२२ ला मुदतवाढ, नवी तारीख जाहीर Rojgar News

NEET MDS परीक्षा २०२२ ला मुदतवाढ, नवी तारीख जाहीर Rojgar News

Postponed: मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी किंवा NEET साठी राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षेला मुदतवाढ देण्यात आली आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स किंवा NBE द्वारे परीक्षा पुढे ढकलण्याबरोबरच नवीन तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. नव्या अपडेटनुसार ही परीक्षा ४ जून रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा १९ डिसेंबर रोजी होणार होती. २०२२-२३ बॅचचे प्रवेश अद्याप पूर्ण न झाल्याने परीक्षेला विलंब झाल्याचे बोर्डाने म्हटले आहे. शैक्षणिक सत्र २०२१-२२ चे प्रवेशांना होणार उशीर आणि प्रवेश अद्याप पूर्ण न झाल्यामुळे, शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये प्रवेशासाठी NEET-MDS २०२२ चे आयोजन दंत चिकित्सा परिषदेच्या सहमतीने पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 'NEET-MDS २०२२ आता ४ जून २०२२ रोजी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिकृत वेळापत्रकानुसार, NEET MDS समुपदेशन २०२१ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. ही परीक्षा १६ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात आली होती. ३१ डिसेंबर २०२० रोजी निकाल जाहीर करण्यात आले होते. पण समुपदेशन प्रक्रिया ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू झाली. केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार ऑल इंडिया कोटा (AIQ) जागांवरील ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मागितलेल्या स्पष्टीकरणामुळे समुपदेशन प्रक्रियेला विलंब झाला.या वर्षासाठी, सध्याच्या आरक्षण धोरणांनुसार समुपदेशन केले गेले अशी माहिती सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली. NTA NEET 2021 फेज २ अर्ज पुन्हा सुरु नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश चाचणी - अंडर ग्रॅज्युएट (NEET UG) च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज प्रक्रिया आणि अर्ज सुधारणा विंडो पुन्हा सुरू केली आहे. मेडिकलचे उमेदवार NEET UG च्या दुसऱ्या टप्प्यासाठी २६ ऑक्टोबर रात्री ११.५० वाजेपर्यंत नोंदणी करू शकतात. फेज २ चा अर्ज पूर्ण करण्यासाठी, उमेदवारांना नोंदणी क्रमांक आणि जन्मतारखेच्या मदतीने लॉगिन करावे लागेल. त्याचप्रमाणे उमेदवारांना अर्ज दुरुस्तीसाठी देखील लॉगिन करावे लागेल. याआधी भरलेल्या NEET UG अर्जामध्ये विद्यार्थी त्यांचे लिंग, राष्ट्रीयत्व, ई-मेल पत्ता, श्रेणी, उपश्रेणी एडीट करु शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pseDzE
via nmkadda

0 Response to "NEET MDS परीक्षा २०२२ ला मुदतवाढ, नवी तारीख जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel