Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २२, २०२१ WIB
Last Updated 2021-10-22T06:43:32Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NEET Result 2021: नीट यूजी प्रवेश परीक्षेचा निकाल २६ ऑक्टोबरनंतर Rojgar News

Advertisement
2021: राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (यूजी) - २०२१ च्या निकालाची वाट पाहणाऱ्या उमेदवारांना आणखी थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे. परीक्षेचे आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मडिकल आणि डेंटल कोर्सेजमध्ये प्रवेशासाठी नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रेंस (यूजी) -२०२१ म्हणजेच (यूजी) २०२१ साठी अर्ज सुधारणा विंडो पुन्हा एकदा खुली केली आहे. यामुळे उमेदवारांना अर्जातील त्रुटी सुधारता येणार आहेत. २१ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत अर्जात करेक्शन करण्यासाठी विंडो खुली राहणार आहे. अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर यासंदर्भात नोटीस जाहीर करण्यात आली आहे. अर्जातील करेक्शन झाल्यानंतर एनटीएकडून नीट रिझल्ट २०२१ ची घोषणा करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. नीट यूजी २०२१ अर्जात करा सुधारणा ज्या उमेदवारांना नीट यूजी २०२१ च्या अर्जात सुधारणा करायची आहे त्यांनी परीक्षा पोर्टलवर जाऊन होमपेजवर दिल्या गेलेल्या अॅप्लीकेशन करेक्शनच्या लिंकवर क्लिक करा. पुन्हा नव्या पेजवर अर्ज क्रमांक आणि पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करा. उमदेवार आपल्या अर्जामध्ये आवश्यक सुधारणा करु शकतात. द्वारे जारी NEET (UG) 2021 अर्ज सुधारणा संदर्भातील नोटीसनुसार, उमेदवारांना त्यांच्या अर्जाच्या काही तपशीलांमध्ये सुधारणा किंवा दुरुस्ती करण्याची परवानगी आहे. या तपशीलांमध्ये पहिल्या टप्प्यातील तपशील-लिंग, राष्ट्रीयत्व, ईमेल पत्ता, श्रेणी, उपश्रेणी तसेच फेज II मध्ये सादर केलेल्या सर्व तपशीलांचा समावेश आहे. उमेदवारांसाठी अर्ज दुरुस्ती करण्याची शेवटची संधी असेल. नीट यूजी २०२१ निकालाच्या घोषणेआधी एनटीए परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका जाहीर करेल. त्यानंतर त्या उत्तरतालिकेवर हरकती मागवण्यात येतील. त्यांच्या समीक्षेनंतरच अंतिम उत्तरतालिका आणि निकाल घोषित केले जातील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3C7ngTt
via nmkadda