Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १३ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर १३, २०२१ WIB
Last Updated 2021-10-13T10:43:06Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NTA द्वारे नॅशनल अॅप्टीट्यूड टेस्ट लाॅंंच, उत्तम करिअर निवडण्यास होणार मदत Rojgar News

Advertisement
NAT 2021: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने १३ ते २५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट (NAT 2021) लॉंच केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उत्तम करिअर निवडण्यास मदत होणार आहे. एनटीएने या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. यासाठी इच्छुक उमेदवार १८ ऑक्टोबरपर्यंत अधिकृत वेबसाइट nat.nta.ac.in वर परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. NTA (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) ने जाहीर केलेल्या या परीक्षेला उपस्थित राहण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ही चाचणी (NTA NAT 2021)१३ ते २५ वयोगटातील शालेय विद्यार्थी आणि तरुणांना त्यांच्या वैचारिक आकलनाचे शास्त्रीय पद्धतीने मूल्यांकन करण्यास मदत करते. विद्यार्थ्यांना करिअरमध्ये योग्य निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी प्रथमच ()जाहीर करण्यात आली आहे. एनटीएने दिली माहिती नॅशनल अॅप्टीट्यूड टेस्ट (NTA 2021) बद्दल, NTA ने दिलेल्या माहितीनुसार योग्य आणि पात्र उमेदवाराला सर्वोत्तम संस्थांमध्ये प्रवेश मिळेल. देशातील विद्यार्थ्यांना योग्य ती संधी मिळेल. सर्व उमेदवारांसाठी NTA NAT परीक्षा निशुल्क आहे. NTA ने उमेदवारांना त्यांचे परीक्षा केंद्र निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. महत्वाच्या तारखा एनएटी २०२१ अर्ज प्रक्रियेला सुरुवात - ११ ऑक्टोबर २०२१ NET साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख - १८ ऑक्टोबर २०२१ लेव्हल (१३ ते १५ वर्षे) आणि लेव्हल २ (१६ ते १८ वर्षे) साठी परीक्षेची तारीख- २३ ऑक्टोबर २०२१ लेव्हल ३ (१९ ते २१ वर्षे) आणि लेव्हल ४ (२२ ते २५ वर्षे) साठी परीक्षेची तारीख - २४ ऑक्टोबर २०२१ याप्रमाणे अर्ज करा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट nat.nta.ac.in वर जा. वेबसाइटच्या होमपेजवर NAT 2021 ऑनलाईन नोंदणीवर क्लिक करा. नवीन नोंदणीवर क्लिक करा किंवा साइन इन करा. तुमचे सर्व तपशील भरुन अर्ज पूर्ण करा. मागितलेली कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. नॅशनल अॅप्टीट्यूड टेस्ट (NAT 2021) फॉर्म सबमिट करा. भविष्यातील संदर्भांसाठी फॉर्मची प्रिंट डाउनलोड करा. बातमीखाली देण्यात आलेल्या थेट लिंकवरुन देखील तुम्ही अर्ज करु शकता. NTA तर्फे पहिल्या दोन कॅटेगरीमध्ये साधारण ५,२०० आणि तिसऱ्या आणि चौथ्या कॅटेगरीमध्ये ५ हजार उमेदवारांची टेस्ट घेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. परीक्षेत बसू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून NTA ने ऑनलाईन अर्ज मागवले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YHzlk5
via nmkadda