Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २३, २०२१ WIB
Last Updated 2021-10-23T11:43:44Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

ONGC मध्ये विविध पदांची भरती; परीक्षेची उत्तरतालिका जाहीर Rojgar News

Advertisement
Answer Key 2021: ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (Oil and Natural Gas Corporation or ONGC) ने ओएनजीसी उत्तरतालिका जाहीर केली आहे. फायनान्स अॅण्ड अकाऊंट्स ऑफिसर (Finance & Accountant Officer), सुरक्षा अधिकारी (), असिस्टंट एक्झिक्युटीव्ह इंजिनीअर, पर्यावरण (Assistant Executive Engine) या पदांसाठी जे उमेदवार या पदांसाठी झालेल्या परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका उमेदवारांना पाहता येणार आहे. या परीक्षेला उपस्थित राहिलेल्या उमेदवारांना ONGC ची अधिकृत वेबसाइट ongcindia.com वर जाऊन बातमीतील स्टेप्स फॉलो करुन उत्तरतालिका डाऊनलोड करता येणार आहे. महत्वाच्या तारखा अकाऊंट्स ऑफिसर आणि इतर पदांसाठी परीक्षा - १७ आणि १८ ऑक्टोबर २०२१ अकाऊंट्स ऑफिसर आणि इतर पदासाठी परीक्षेची तारखा - २२ ऑक्टोबर २०२१ ONGC 2021: उत्तरतालिका अशी करा डाऊनलोड सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ongcindia.com वर जा. आता करियर टॅब वर क्लिक करा आणि नंतर रिक्रूटमेंट नोटीस वर क्लिक करा. आता एक नवीन विंडो उघडेल. उमेदवारांनी आता ONGC जाहिरात क्रमांक १/२०१९ (R&P) उत्तरतालिका लिंकवर क्लिक करा. एका नवीन पेज खुले होईल. उमेदवारांनी त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकून लॉगिन करावे. आता उत्तरतालिका स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील उपयोगासाठी उत्तरतालिकेची प्रिंट स्वत:कडे ठेवा. अर्ज भरताना उमेदवारांनी निवडलेल्या केंद्रावर १७ ऑक्टोबरला ही परीक्षा घेण्यात आली. उमेदवारांनी लक्षात घ्यावे की ही तात्पुरती उत्तरतालिका आहे. कोणत्याही उमेदवाराला त्यांच्या उत्तराची तपासणी योग्य नसल्याचे वाटत असेल तर ते त्याबद्दल आक्षेप नोंदवू शकतात. उमेदवारांनी आक्षेप ऑनलाइन नोंदवावेत. संस्थेकडे प्राप्त झालेल्या अर्जांवर विचार केला जाईल. त्यानंतर अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध केली जाईल. ३०९ पदांची भरती ऑइल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) मध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थी पदासाठी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या अंतर्गत एकूण ३०९ पदांची भरती केली जाणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट www.ongcindia.com वर नोटिफिकेशन तपासून अर्ज करू शकतात. १ नोव्हेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ओएनजीसीने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार इंजिनीअरिंग आणि जिओ सायन्स विषयामध्ये गेट २०२१ स्कोरच्या माध्यमातून अर्ज करु शकतात. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य / ईडब्ल्यूएस / ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ३०० रुपये असेल. तर अनुसूचित जाती/ जमाती/ पीडब्ल्यूबीडी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3C3w2SB
via nmkadda