पदविका आणि प्रमाणपत्रचे २० अभ्यासक्रम बंद; पुणे विद्यापीठाचा निर्णय Rojgar News

पदविका आणि प्रमाणपत्रचे २० अभ्यासक्रम बंद; पुणे विद्यापीठाचा निर्णय Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, नाशिक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत पदविका आणि प्रमाणपत्राचे २० अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांना प्रतिसाद कमी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसोबतच पुणे विद्यापीठामार्फत काही पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमही राबविले जातात. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यापीठामार्फत प्रवेश परीक्षाही घेतली जाते. यंदा काही अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांना जागांच्या तुलनेत खूपच कमी विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केल्याचे निदर्शनास आल्यामुळे विद्यापीठाने या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा रद्द केली होती. गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठाच्या काही अभ्यासक्रमांसाठी ठरवून देण्यात आलेली विद्यार्थी क्षमता पूर्ण होत नसल्यामुळे याचा आर्थिक भारही विद्यापीठावर पडत होता. त्यामुळे हे २० पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम बंद करण्यात आल्याची माहिती विद्यापीठामार्फत देण्यात आली. विद्यार्थ्यांचा सातत्याने कमी प्रतिसाद असलेल्या अभ्यासक्रमांचा अभ्यासपूर्ण अहवाल विद्यापीठ प्रशासनाने तयार केला होता. विद्यार्थ्यांची पाठ विद्यार्थी प्रतिसादाअभावी विद्यापीठावरील आर्थिक ताण वाढणाऱ्या अभ्यासक्रमाच्या विभागप्रमुखांशी बोलून हा निर्णय घेण्यात आल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे. यंदाही या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश झालेले नसल्याने ते यंदापासून बंद केले जाणार आहेत. अनेकदा विद्यार्थ्यांना 'व्हॅल्यू अॅडिशन' म्हणून पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करायचा असतो. त्यासाठीची विद्यार्थी संख्या विद्यापीठामार्फत निश्चित केली जाते. परंतु, विद्यार्थी या अभ्यासक्रमांकडे पाठ फिरवत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. बंद करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांची माहिती विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनामार्फत देण्यात आली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3apXsWH
via nmkadda

0 Response to "पदविका आणि प्रमाणपत्रचे २० अभ्यासक्रम बंद; पुणे विद्यापीठाचा निर्णय Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel