Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २६, २०२१ WIB
Last Updated 2021-10-26T07:43:14Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

महात्मा गांधी राष्ट्रीय फेलोशिपचा २१ ते ३० वर्षांच्या महिला आणि पुरुषांना 'असा' होणार लाभ Rojgar News

Advertisement
Mahatma Gandhi National : (MGNF) च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याहस्ते करण्यात आले. तळागाळातील कौशल्य विकास वाढविण्यात योगदान देण्याच्या उद्देशाने तरुण, गतिमान लोकांसाठी संधी निर्माण करणे हे या फेलोशिपचे उद्धीष्ट असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितले. IIM ही कंपनी फेलोशिपमधील शैक्षणिक भागीदार आहे. जी जिल्हा स्तरावर क्लासरुम सत्र आयोजित करुन रोजगार, आर्थिक उत्पादन आणि उपजीविका वाढवण्यासाठी विश्वासार्ह योजना बनविणे आणि यामध्ये येणारे अडथळे ओळखण्याचे काम करते. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान () यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाच्या प्रयत्नांतून तळागाळातील सामाजिक बदलाचे आवाहन केले. त्यांनी जिल्हा दंडाधिकारी आणि शैक्षणिक भागीदार IIM यांना या फेलोशिपद्वारे फेलोंमध्ये बदल घडवून आणण्यास सांगितले. स्वावलंबी भारताच्या दिशेने देशाची वाटचाल सुरु असल्याचे सांगत त्यांनी विविध क्षेत्रातील मोठ्या बदलांमुळे नवीन कुशल आणि अधिक कुशल व्यावसायिकांची मागणी वाढेल असेही सांगितले. यासाठी कौशल्ये ओळखण्याची आणि थेट कौशल्य विकासाचे प्रयत्न जिल्हा स्तरावर करण्याची गरज आहे. त्यांनी २१ व्या शतकातील गरजा आणि स्थानिक वास्तव लक्षात ठेवण्यास सांगितले. त्याच वेळी स्थानिक भाषेत कौशल्य विकास प्रयत्नांचे एकत्रीकरण करुन जागतिक दृष्टीकोन आणि स्थानिक दृष्टीकोनातून काम करण्याचे आवाहन धर्मेंद्र प्रधान यांनी केले. नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन (NEP) २०२० वर बोलताना, प्रधान यांनी शिक्षण आणि कौशल्य यांच्यात एक मजबूत समन्वय निर्माण करण्याच्या दृष्टीकोनाबद्दल सांगितले. एज्युकेशन बँक ऑफ क्रेडिटसह या दिशेने घेतलेल्या पुढाकारांचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल जागरूक करावे अशी विनंती त्यांनी यावेळी IIM ला केली. २०१८ मध्ये लाँच SANKALP भारत सरकारने जानेवारी २०१८ मध्ये जागतिक बँक कर्ज-सहाय्यित कार्यक्रम 'कौशल्य संकलन आणि उपजीविका प्रोत्साहनासाठी ज्ञान जागरूकता' संकल्प (SANKALP) चे उद्घाटन करण्यात आले. देशातील कुशल कामगारांची मागणी आणि पुरवठा यामधील अंतर प्रभावीपणे भरून काढण्यासाठी 'संकल्प' जिल्हा कौशल्य समित्यांसह (DSCs) कार्य करते. ज्यामुळे तरुणांना काम करण्याची आणि कमाई करण्याच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात असे प्रधान म्हणाले. MGNF ही २१ ते २० वयोगटातील महिला आणि पुरुषांसाठी एक संधी आहे. कौशल्य विकासाच्या वितरणात सुधारणा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला प्रेरक सहाय्य करण्यासाठी आधीच काही प्रमाणात शैक्षणिक किंवा व्यावसायिक कौशल्य प्राप्त केली आहेत. MGNF फेज-१ (पायलट) ला शैक्षणिक भागीदार म्हणून आयआयएम बंगळुरूसोबत लॉंच करण्यात आले. सध्या या कार्यक्रमाअंतर्गत ६ राज्यांतील ६९ जिल्ह्यांमध्ये ६९ फेलो कार्यरत आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30SnrV2
via nmkadda