Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर १९, २०२१ WIB
Last Updated 2021-10-19T12:43:38Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेत भरती, ५५ हजारपर्यंत मिळेल पगार Rojgar News

Advertisement
Recruitment 2021: आयुष मंत्रालयात किंवा योगाच्या क्षेत्रात सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग (MDNIY) नवी दिल्ली येथे सल्लागारांच्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सल्लागाराची पदे कंत्राटी तत्वावर भरती केली जाणार आहे. सुरुवातीला हा कालावधी १ वर्षाचा असेल. त्यानंतर संस्थेची आवश्यकता आणि उमेदवाराच्या कामगिरीवर हा कालावधी वाढवला किंवा कमी केला जाऊ शकतो. याप्रमाणे करा अर्ज MDNIY सल्लागार भरती २०२१ भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट yogamdniy.nic.in वर जाऊन अर्ज करु शकतात. खाली दिलेल्या थेट लिंकवरुन नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता. अर्ज नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. हा फॉर्म पूर्ण भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. स्पीड पोस्ट किंवा नोंदणीकृत पोस्टद्वारे संचालक, , ६८, अशोका रोड, नवी दिल्ली - ११०००१ या पत्त्यावर पाठवा. ३० सप्टेंबर २०२१ ला यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या तारखेपासून २१ दिवसांच्या आत उमेदवारांना अर्ज सादर करावा लागेल. पोस्टनिहाय रिक्त जागा आणि पगार वरिष्ठ सल्लागार (क्रीडा व्यवस्थापन) - १ पद - ५५ हजार रुपये सल्लागार (प्रशासन) - २ पदे - ५० हजार रुपये सल्लागार (एक्स्टेंशन अॅक्टीव्हिटी) - १ पोस्ट - ५० रुपये सल्लागार (इस्टॅब्लिश्मेंट)- १ पद- ५० हजार सल्लागार (पीए ते डायरेक्टर) - १ पद - ५० हजार रुपये सल्लागार (IT) - १ पद -५० हजार रुपये मीडिया सल्लागार- २ पदे- ५० हजार रुपये सल्लागार (तांत्रिक) - २ पदे - ५० हजार रुपये


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BVsSQB
via nmkadda