सैनिक स्कूल सोसायटीसोबत शंभर शाळांच्या संलग्नतेला मंजुरी Rojgar News

सैनिक स्कूल सोसायटीसोबत शंभर शाळांच्या संलग्नतेला मंजुरी Rojgar News

Affiliation with Sainik School: शालेय विद्यार्थ्यांची सैनिकी प्रशिक्षणाची इच्छा पूर्ण होणार आहे यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अंतर्गत मंत्रिमंडळाने शासकीय आणि खासगी अशा १०० शाळांना सैनिक शाळांसोबत संलग्नतेला मंजुरी दिली आहे. या शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये इयत्ता सहावीपासून याची सुरुवात होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP २०२० अंतर्गत हा पुढाकार घेण्यात आला आहे. या १०० शाळांमधील अभ्यासक्रमाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या शाळा खासगी आणि सरकारी अशा दोन्ही क्षेत्रात स्थापन केल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. अधिकृत माहितीनुसार मूल्य आधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित करुन मुलांना चारित्र्य, शिस्त, राष्ट्रीय कर्तव्याची भावना आणि देशभक्तीसह प्रभावी नेतृत्व विकसित केले जावे हा यामागचा हेतू आहे. या शाळा संरक्षण मंत्रालयाच्या विद्यमान सैनिक शाळांपेक्षा वेगळ्या असतील असेही यामध्ये म्हटले आहे. १०० नवीन संलग्न सैनिक शाळांना देशभरात पसरलेल्या ३३ सैनिक शाळांमधील प्रशासकीय अनुभव घेता येणार आहे. सैनिक शाळा सोसायटीशी संलग्न होण्यासाठी सरकारी/खासगी शाळा/स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑल इंडिया एंट्रन्स एक्झाम (All India Sainik Schools Entrance Exam, AISSEE 2022)चे फॉर्म जाहीर करण्यात आले आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( National Testing Agency, NTA)ने सहावी आणि नववी इयत्तेतील प्रवेशासाठी ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा २०२२ (AISSEE) साठी अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. सहावी आणि नववीमधील प्रवेशासाठी इच्छुक आणि पात्र विद्यार्थी अधिकृत वेबसाइट aissee.nta.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरु शकतात. २६ ऑक्टोबर २०२१ सायंकाळी ५ पर्यंत विद्यार्थी आणि पालकांना यासाठी अर्ज करता येणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BC8i80
via nmkadda

0 Response to "सैनिक स्कूल सोसायटीसोबत शंभर शाळांच्या संलग्नतेला मंजुरी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel