Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २३, २०२१ WIB
Last Updated 2021-10-23T08:43:40Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

ऑफलाइन परीक्षांना प्राधान्य; उदय सामंत करणार विद्यापीठांशी चर्चा Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आता ऑफलाइन वर्ग सुरू झाल्याने परीक्षाही ऑफलाइन पद्धतीने व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करावे लागतील. विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा प्रत्यक्ष परीक्षेकडे वळवावे लागेल. यासाठी महाविद्यालयांनी प्रयत्न करणे गरजेचे असून उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून ऑफलाइन परीक्षांसंदर्भात विद्यापीठांशी चर्चा केली जाईल, असे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. पुण्यात एका कार्यक्रमानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ऑफलाइन शिक्षण सुरू झाले असून आता विद्यार्थी कॉलेजमध्ये येऊ लागतील. अशा परिस्थितीत परीक्षाही ऑफलाइन पद्धतीने होणे गरजेचे आहे. ऑनलाइन परीक्षांकडून विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षांकडे वळवावे लागणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना आता ऑनलाइन परीक्षांची सवय लागली आहे. ती सवय मोडायला हवी, यासाठी यापुढे महाविद्यालयांमध्ये ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्या जाव्यात, असा प्रयत्न असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. परीक्षा ऑफलाइनच घ्याव्यात, याची कोणतीही सक्ती केली जाणार नाही. मात्र, सर्व महाविद्यालये, विद्यापीठ यांनी प्रत्यक्ष परीक्षा घ्याव्यात , याकरता प्रयत्न केले जातील, असे सामंतर यांनी सांगितले. ऑनलाइन परीक्षांच्या गुणपत्रिकेमुळे नोकऱ्यांसाठी येत असलेल्या अडचणींबद्दलही सामंत यांनी स्पष्टीकरण दिले. ऑनलाइन परीक्षांची गुणपत्रिका असली तरी सर्व प्रकारच्या शासकीय नोकऱ्यांसाठी ती ग्राह्य धरली जाणार आहे. याशिवाय खासगी क्षेत्रालाही त्या ग्राह्य धरण्याच्या सूचना देण्यात आल्या असून कोणत्याही खासगी कंपनीने ऑनलाइन परीक्षेची गुणपत्रिका स्वीकार करण्यास नकार देत नोकरी नाकारली तर संबंधित कंपन्यांवर कारवाई करणार असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले. दिवाळी नंतर कॉलेज सुरळीत होतील. सध्या कॉलेजमध्ये कमी संख्येने विद्यार्थी दिसत आहेत. याचे प्रमुख कारण येऊ घातलेली दिवाळी आहे. दिवाळीनंतरच कॉलेजमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित राहतील. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिवाळीपूर्वी कॉलेज सुरू करून एकप्रकारे व्यवस्था तपासून पाहण्याचा प्रयत्न केला आहे, असे सामंत यांनी सांगितले. ४० लाख विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान मोठ्याप्रमाणावर लसीकरणाची मोहीम राबवली जाणार आहे. राज्यातील ५ हजार महाविद्यालयांमध्ये लसीकरण केले जाणार असून सुमारे ४० लाख विद्यार्थ्यांसाठी ही मोहीम राबवण्यात येईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jt7WJL
via nmkadda